मुंबईच्या 'द ललित' हॉटेलमध्ये लसीकरण, संतप्त महापौरांची धडक

घरच्या सारख्या साध्या फ्रीज मध्ये लसी ठेवल्या होत्या.
मुंबईच्या 'द ललित' हॉटेलमध्ये लसीकरण, संतप्त महापौरांची धडक
Updated on

मुंबई: मुंबईच्या 'द ललित' (The lalit hotel) या प्रसिद्ध हॉटेल मध्ये लसीकरण होत असल्याच समजलं. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai mayor kishori pednekar) यांनी अचानक या ठिकाणी धडक दिली. 23 तारखेपासून दिवसाला 500 जणांना लस (vaccine doses) दिल्याचं समोर आलंय. गंभीर बाब म्हणजे या लसी घरच्या सारख्या साध्या फ्रीज मध्ये स्टोर करण्यात आल्यात ज्यावर महापौरांनी आक्षेप घेतलाय. (Mumbai mayor kishori pednekar visited hotel the lalit where vaccination was done)

"सुश्रुत आणि क्रीटीकेअर 2 हॉस्पिटलने ललित सोबत करार केला. यामध्ये ही परवानगी केंद्राकडून आहे मात्र याची माहिती महापालिकेला दिलीच नाही जे गंभीर आहे. कोल्ड स्टोरेज मेंटेन केलं गेलं नाही यावर माझा आक्षेप आहे. यावर दोन्ही हॉस्पिटलला जाब विचारणार आहे" असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

मुंबईच्या 'द ललित' हॉटेलमध्ये लसीकरण, संतप्त महापौरांची धडक
पोलिसाने महिला पोलिसावर केला बलात्कार, घाटकोपरमधील घटना

"लस देण्यासाठी ज्या sop असतात त्याचं उल्लंघन याठिकाणी झालं. महापालिकेला इथे लसीकरण होत असल्याचं कळवायला हवं होतं. चौकशी करून पुढे निर्णय घेऊ" असे महापौर म्हणाल्या. मुंबईत हॉटेलमध्ये, खासगी हॉस्पिटल्समध्ये होणाऱ्या लसीकरणावर आता टीका सुरु झालीय. २५० आणि ४०० रुपयांच्या लसींचे डोस १ हजार, १४०० रुपयांना दिले जातायत, त्यावर काँग्रेस नेत्यांनी टीका सुरु केलीय.

मुंबईच्या 'द ललित' हॉटेलमध्ये लसीकरण, संतप्त महापौरांची धडक
पंतप्रधान मोदींचे अश्रू म्हणजे मगरीचे अश्रू - भाई जगताप

मुंबईत लस टंचाई आहे, मग धंदा कसा सुरु झाला?

"मुंबईत लसीकरणाच्या (Mumbai vaccination) नावावर धंदा सुरु झाला आहे. बाजाराची एक जुनी वाईट पद्धत आहे. आधी कुठल्याही वस्तुची टंचाई निर्माण करा. लोकांमध्ये हाहाकार निर्माण करा, गोंधळ होऊं दे, त्यानंतर चढ्या दराने मोठ्या किंमतीला मालाचा पुरवठा करायचा. लसीच्या बाबतीतही (vaccine shortage in mumbai) सध्या हेच सुरु आहे" अशी टीका माजी खासदार आणि काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केली.

"केंद्राला लस १५० रुपयाला, राज्याला २५० रुपयांना आणि खासगी हॉस्पिटल्सना ४०० रुपयांना लस विकली जात आहे. आज खासगी हॉस्पिटल मुंबईतील वेगवेगळे गृहनिर्माण सोसायटयांबरोबर डील करत आहेत. लोकप्रतिनिधीही डील करतायत. १२०० रुपयांना लस विकली जात आहे. काही आमदारांनी लसीकरणाचं काम सुरु केलं आहे. सामान्य नागरिकांकडून १ हजार रुपये वसूल केले जात आहेत" अशी टीका निरुपम यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.