Mumbai : रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल; रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवस ब्लॉक नाही

ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील.
Indian Railway
Indian Railwayesakal
Updated on

मुंबई - उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी २३ जुलै २०२३ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Indian Railway
Pune News : पुणे पोलिसांची मोठी कामगिरी! दहा लाखांचे बक्षीस असलेल्या दोन दहशतवाद्यांना कोथरूडमधून अटक

मध्य रेल्वेच्या माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल- वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेच्या वसई रोड-विरार अप आणि डाउन धीम्या मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे.

मध्य रेल्व -

कुठे- माटुंगा- मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर

कधी- सकाळी ११ .०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

परिणाम -

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशीराने पोहोचेल.

Indian Railway
Mumbai Rain: लोकलसाठी रेल्वे स्थानकात तुफान गर्दी! मुख्यमंत्र्यांनी बेस्ट, एसटीला दिले 'हे' आदेश

हार्बर रेल्वे

कुठे - पनवेल- वाशी अप आणि डाउन मार्गावर

कधी - ११. ०५ ते ४.०५ वाजेपर्यंत

परिणाम -

ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे.

Indian Railway
Mumbai News : मुंबईतील दरडींच्या दाढेतील 22 हजार झोपड्यांवर भितीचे सावट

पनवेल येथून सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून पनवेल करीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी दरम्यान विशेष लोकल धावणार आहे. ब्लॉक कालावधीत बेलापूर - खारकोपर आणि नेरुळ - खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील.

Indian Railway
Mumbai Crime : बँक फसवणूक प्रकरणी जेट एअरवेजचे नरेश गोयलांविरोधात ईडीने केला गुन्हा दाखल

पश्चिम रेल्वे

कुठे - वसई रोड - विरार अप आणि डाउन धीम्या मार्गावर

कधी - रात्री १२. ३० ते पहाटे ४.०० वाजेपर्यंत

परिणाम -

ब्लॉक कालावधीत वसई रोड ते विरार स्थानकादरम्यान धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे.

तर ब्लॉग कालावधीत काही लोकल सेवा रद्द असणार आहे. रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवस कोणताही मेगाब्लॉक नसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.