Mumbai Metro 3: मुंबईतल्या पहिल्या अंडरग्राऊंड मेट्रोचं काम पूर्ण; थांबे, तिकीट अन् मार्ग.. जाणून घ्या सर्वकाही

Ashwini Bhide: एमएमआरसीएल अर्थात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या एमडी अश्विनी भिडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन मुंबई मेट्रो ३ बद्दल माहिती दिली. मेट्रो तीनच्या पहिला टप्पा आरे ते बीकेसीपर्यंत असणार आहे. या दरम्यान तब्बल १० स्थानकं असतील. पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा मेट्रोमार्ग सरु होण्याचा अंदाज आहे.
Mumbai Metro 3: मुंबईतल्या पहिल्या अंडरग्राऊंड मेट्रोचं काम पूर्ण; थांबे, तिकीट अन् मार्ग.. जाणून घ्या सर्वकाही
Updated on

Mumbai new metro line: मुंबईतली पहिली अंडरग्राऊंड मेट्रो लवकच म्हणजे अगदी पुढच्याच महिन्यात धावणार आहे. मुंबई मेट्रो तीनचं काम पूर्ण झाल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडच्या एमडी अश्विनी भिडे यांनी दिली.

मुंबईतली ही भूमिगत मेट्रो आरे ते बीकेसी यादरम्यान चालणार आहे. पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. याशिवाय वाहतुकीची समस्या कमी होणार आहे. या मार्गाचं उद्घाटन पुढच्या महिन्यात होण्याची शक्यता आहे.

एमएमआरसीएल अर्थात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या एमडी अश्विनी भिडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन मुंबई मेट्रो ३ बद्दल माहिती दिली. मेट्रो तीनच्या पहिला टप्पा आरे ते बीकेसीपर्यंत असणार आहे. या दरम्यान तब्बल १० स्थानकं असतील. पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा मेट्रोमार्ग सरु होण्याचा अंदाज आहे.

Mumbai Metro 3: मुंबईतल्या पहिल्या अंडरग्राऊंड मेट्रोचं काम पूर्ण; थांबे, तिकीट अन् मार्ग.. जाणून घ्या सर्वकाही
Akshay Shinde Encounter: ''अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट'' वडिलांची हायकोर्टात धाव, SIT चौकशीची मागणी

मेट्रो तीनच्या फेज दोनचं काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज असल्याचं अश्विनी भिडेंनी सांगितलं. दुसऱ्या टप्प्यामध्ये अनेक मोठ्या स्थानकांचा समावेश आहे. त्यात वरळी, गिरगाव यांचा समावेश आहे. तसेच बीकेसी ते कफ परेड हा मार्ग पुढच्या वर्षी एप्रिलपर्यंय पूर्ण होईल.

मेट्रो तीनच्या फेज वनमध्ये असणाऱ्या १० स्थानकांवर रोज ९६ फेऱ्या होतील. सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत ९ गाड्या धावणार आहे. त्यासाठी ४८ ट्रेन कॅप्टन काम करतील. त्यात १० महिलांचा समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे पहिल्या टप्प्यासाठी तिकीट दर केवळ १० रुपये ते ५० रुपये असेल, अशी माहिती भिडेंनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.