मुंबईत मेट्रोचे काम सुरु असताना अपघात; क्रेन ड्रायव्हरचा जागीच मृत्यू

मुंबईत मेट्रोचे काम सुरु असताना अपघात होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.
Metro Working
Metro WorkingSakal
Updated on

मुंबई : मुंबईत मेट्रोचे काम सुरु असताना अपघात होऊन एकाचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडलीय. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर रविवारी सकाळी मेट्रो लाईनचे गर्डर टाकण्याचे काम सुरू असताना तेथील क्रेन कोसळून हा अपघात घडला. या अपघातात क्रेनच्या ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला. मृत ड्रायव्हरचे नाव लवदीप रविंद्र सिंग असे असून तो ५०० टन क्षमता असणाऱ्या क्रेनचा चालक होता. MMRDA च्या अंतर्गत चालू असलेल्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर हा अपघात घडला. (Mumbai Metro Work Accident)

ही घटना सकाळी ६ च्या सुमारास घडली असून JVLR च्या सिग्नलजवळ दोन क्रेनच्या सहाय्याने मेट्रोचे गर्डर टाकण्याचे काम चालू होते. दोन क्रेनने एकावेळी गर्डर टाकताना एका क्रेनकडील माती खचली व त्यानंतर एक क्रेन वर जाऊन समतोल बिघडला. त्यानंतर एकापाठोपाठ क्रेन कोसळून ड्रायव्हर क्रेनखाली दाबला गेला. त्यानंतर दुसऱ्या क्रेनच्या सहाय्याने दबलेल्या ड्रायव्हरला काढण्यात आले असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Metro Working
स्वाभिमानीच्या पुणे जिल्हाध्यक्षावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

घटनेनंतर ड्रायव्हरला राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. कांजुरमार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून या घटनेत दुसरे कुणीही जखमी झाले नसल्याचे स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.