Mumbai Metro in Dongri: मुंबईकरांची कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारकडून एमएमआर क्षेत्रात मेट्रोचे जाळे उभारले जात आहे. विविध मार्गावर धावणाऱ्या मेट्रो ट्रेनची देखभाल दुरुस्तीबरोबच त्यांचे संचलन, कारभार एकाच ठिकाणाहून करता यावा म्हणून एमएमआरडीएने पश्चिम उपनगरातील रेड लाईन मेट्रो मार्गिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या (मेट्रो -९, ७ आणि ७ अ) या मार्गिकांसाठी उत्तननजीक डोंगरी येथे तब्बल ६२९ कोटी रुपये खर्चून ४१. ३६ हेक्टर जागेवर प्रशस्त कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
साध्य पश्चिम उपनगरात रेड लाईन मेट्रो अंतर्गत दहिसर पूर्व- गुंदवली दरम्यान मेट्रो धावत असून ती पुढे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत आणि दहिसरच्या पुढे मीरा भाईंदर- डोंगरीपर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने डोंगरी येथे प्रशस्थ मेट्रो कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १२ मार्चपर्यंत निविदा मागवल्या आहेत. सुमारे ६२९ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणार हे अत्याधुनिक कारशेड ५२ महिन्यात उभारले जाणार आहे.
- डोंगरी येथे उभारल्या जाणाऱ्या या मेट्रो कारशेडमध्ये मेट्रोचा नियंत्रण कक्ष, ६९० मीटर लांबीचा टेस्टिंग ट्रॅक, ३ देखभाल दुरुस्ती लाईन, २० स्टेबलिंग लाईन, प्रशासकीय इमारत, निरिक्षण शेड, पॉवर रिसीव्हिंग केंद्र असणार आहे. त्यामुळे रेड लाईन मेट्रो मार्गिकेवरील गाड्या सुरळीतपणे चालवणे शक्य होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.