Mumbai Metro Updates: मुंबईकरांनो मनसोक्त लुटा गणेशोत्सवाचा आनंद, आता 'या' वेळेला धावणार शेवटची मेट्रो

Mumbai Metro Last Train: गुंदवली आणि दहिसर (पूर्व) तसेच अंधेरी (पश्चिम) आणि दहिसर (पूर्व) स्थानकांदरम्यानही काही सेवा विस्तारित केल्या जातील.
Mumbai Metro Updates
Mumbai Metro UpdatesEsakal
Updated on

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमएमओसीएल) ने गणपती उत्सवादरम्यान मेट्रो ट्रेनची दैनंदीन सेवेचा वेळ वाढवण्याची घोषणा केली आहे. आयुक्त संजय मुखर्जी यांनी ही घोषणा केली.

गणेशोत्सव काळात रात्री उशिरा येणारे प्रवासी आणि गणपती उत्सवात सहभागी होणाऱ्या भाविकांच्या वाढलेल्या संख्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. अंधेरी पश्चिम आणि गुंदवली या दोन्ही टर्मिनल्सवर शेवटची मेट्रो 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान रात्री 11.30 वा. धावेल.

अंधेरी (पश्चिम) आणि गुंदवली या दोन्ही टर्मिनल्सवरून शेवटची मेट्रो रात्री 11:30 ला धावेल. यावेळी दोन्ही टर्मिनल्सवरून रात्री 11.15 आणि 11.30 वाजता अतिरिक्त गाड्या सोडण्यात येतील.

गुंदवली आणि दहिसर (पूर्व) तसेच अंधेरी (पश्चिम) आणि दहिसर (पूर्व) स्थानकांदरम्यानही काही सेवा विस्तारित केल्या जातील. रात्री उशिरा उत्सवात सहभागी होणारे नागरिक मेट्रो सेवेद्वारे व्यवस्थित घरी परतू शकतील यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.

“गणपती उत्सव हा मुंबईतील एक महत्त्वाचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि सर्व भक्त आणि नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी आहे. मेट्रो ट्रेनच्या सेवेचा वेळ वाढवून आम्ही प्रवाशांना सणासुदीच्या काळात रात्री उशिरा प्रवास करण्याचा एक सोयीस्कर पर्याय उपलब्ध करुन दिला आहे,” असे मेट्रो अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai Metro Updates
Mumbai-Goa Highway Traffic Video: "प्रत्येक गणेशोत्सवात तेच..." मुंबई-गोवा मार्गावर चार तासांपासून वाहतूक कोंडी, प्रवासी संतापले

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल यांनी सांगितले की, "त्यांनी नेहमीच प्रवाशांच्या गरजांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे गणपती उत्सवादरम्यान भाविकांना गणेशोत्सवाचा आनंद लुटता यावा यासाठी मेट्रो ट्रेनच्या वेळा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे."

Mumbai Metro Updates
Times Tower Fire: कमला मिल्स परिसरातील आगीत जेव्हा 14 जणांनी गमावला होता जीव; 200 लोकांसोबत 2017 मध्ये नेमकं काय घडलं होतं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.