मुंबई : मुंबईतल्या विविध लोकेशनवर २,०३० घरांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडानं जाहिरात काढली होती. या घरांच्या भरमसाठ किंमती असल्यानं मुंबईकरांनी याकडं पाठ फिरवली होती. खूपच कमी अर्ज आल्यानं आता म्हाडानं नोंदणीला मुदतवाढ दिली असून घरांच्या किंमतीही कमी केल्या आहेत. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी याची घोषणा केली.