तर आजच्या आजच कठोर निर्णय; मुंबईच्या पालकमंत्र्यांचा इशारा

Lockdown
Lockdown
Updated on

मुंबई: दादरचे फुल मार्केट हे कायम गजबजलेले असते. कोरोनाचा प्रकोप असूनही येथे रोज मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येते. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे पण तरीदेखील अनेक ठिकाणी कोरोना नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. दादरच्या फुल मार्केटमध्येही अनेक जण मास्क न लावता फिरताना अनेकदा दिसले. याच ठिकाणी आज मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी अकरा वाजता हजेरी लावली आणि तेथील व्यापाऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. व्यापाऱ्यांच्या भेटीनंतर बोलताना असलम शेख यांनी जनतेला एक इशारा दिला.

"आम्ही आधी निर्बंध लावले होते. तेव्हा गर्दी आणि नव्या बाधितांची संख्य आटोक्यात होती. पण सध्या पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर गर्दी जमत आहे. मी स्वत: दादरमध्ये व्यापाऱ्यांशी संवाद साधला आहे. व्यापारी वर्गाशी चर्चा चांगली झाली पण जनता मात्र सहकार्य करत नसल्याची बाब दिसून आहे. हे जर असंच सुरू राहिलं तर मात्र आम्हाला सरकार म्हणून नाईलाजाने काही कठोर निर्णय घ्यावा लागणार हे नक्की. आता मुख्यमंत्रीच या संदर्भात लवकर कठोर निर्णय घेतील. मुंबईत लॉकडाऊन लागू करावा, अशी आमचीही इच्छा आहे. परंतु, मार्केटमधील गर्दी अशीच राहिली तर आजच्या आजच निर्णय घ्यावाच लागेल", असा इशारा असलम शेख यांनी दिला.

"मुंबईत आजच कठोर निर्बंध लागू करावे लागतील. रोज १० हजार रुग्ण आढळणे ही अजिबातच चांगली गोष्ट नाही. ते कोणालाही परवडणार नाही. त्यासाठी नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळलेच पाहिजेत. स्वत:ची आणि इतरांची प्रकृती महत्त्वाची आहे हे साऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता कुठे जीवनाची गाडी मार्गावर येत होती, व्यवहार सुरळीत होत होते, त्यामुळे हे सारं पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेणं खूप अवघड आहे. पण लोकांना अधिक त्रास होऊ नये ही आमची इच्छा आहे. त्यामुळे निर्णय घेतला जाऊ शकतो आणि तो  निर्णय कठोर असेल", असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.