Akasa Air: अकासा एयरच्या 200 हून अधिक साप्ताहिक फ्लाइट्स! 12 ठिकाणांपर्यंत कनेक्टिव्हिटी

Akasa Air
Akasa Air
Updated on

मुंबई - भारतातील सर्वात वेगाने वाढ होणारी विमान कंपनी अकासा एयरने, शहरातून सर्वांगीण हवाई कनेक्टिव्हिटी देण्याच्या प्रयत्नात मुंबईहून नवीन मार्ग आणि अतिरिक्त फ्रिक्वेन्सी जाहीर केल्या आहेत. एअरलाइनने आता मुंबईला हैदराबाद, कोची, गुवाहाटी, वाराणसी, बागडोगरा आणि कोलकाता ते दैनंदिन नॉनस्टॉप फ्लाइटने जोडले आहे.

आपल्या ग्राहकांना वाढीव प्रवास पर्याय देण्यासाठी मुंबई ते बेंगळुरू आणि गोवा सारख्या इतर लोकप्रिय स्थळांपर्यंत त्याची फ्रिक्वेन्सी वाढवली आहे.

Akasa Air
Vidarbha : खरीपात शेतकरी मरणाच्या दारात! महिनाभरात 36 आत्महत्या; पेरणीच्या वेळीच कुटुंबाची वाताहत

दररोज 30 डिपार्चर आणि 200 साप्ताहिक डिपार्चरसह, मुंबई हे अकासा एयरसाठी प्रमुख केंद्रांपैकी एक आहे. व्यावसायिक राजधानीत आणि तेथून हवाई प्रवासाची वाढती मागणी लक्षात घेऊन, एयरलाइनने शहरातून आपले कार्य लक्षणीयरीत्या वाढवले आहे,

सध्या ते अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, लखनौ, गोवा, कोलकाता, हैदराबाद, वाराणसी, बागडोगरा, कोची आणि गुवाहाटी यासह देशभरातील 12 ठिकाणांना दैनंदिन फ्लाईट्ससह कनेक्ट करत आहे.

अकासा एयर ने सर्वसमावेशक, उबदार, आरामदायी आणि कार्यक्षम फ्लाईट्सचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी अनेक उत्कृष्ट उत्पादने आणि सेवा सादर केल्या आहेत. बोईंग 737 MAX विमान पुरेशा लेगरूमसह जागा देते आणि बहुतेक विमानांमध्ये USB पोर्ट्स आहेत, ज्यामुळे प्रवासी त्यांचे गॅझेट आणि उपकरणे प्रवासात चार्ज करू शकतात. सर्व-नवीन सुधारित कॅफे अकासा मेनूमध्ये आरोग्यदायी जेवण, सणासुदीचे आवडते, खवय्ये आणि फ्यूजन जेवण यासह 60 हून अधिक जेवणाचे पर्याय आहेत, जे संपूर्ण भारतातील नामांकित शेफने काळजीपूर्वक तयार केले आहेत.

Akasa Air
Ashok Nete : OBC जनगणना, वनहक्काची अट शिथिल करा! अशोक नेते यांचे राष्ट्रपतींना साकडे

जे आकाशात आनंददायी जेवणाचा अनुभव देतात. अकासा वरील पाळीव प्राणी सोबत असलेल्या ग्राहकांना त्यांच्या पाळीव प्राण्यांसोबत केबिनमध्ये प्रवास करू देते किंवा त्यांचा आकार किती त्याआधारे त्यांना कार्गोमध्ये घेऊन जाण्याची परवानगी देते. प्रवास समावेशक बनवण्याच्या प्रयत्नात, अकासा एयरने दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींसाठी ब्रेलमध्ये सुरक्षा सूचना कार्ड सुद्धा दिलेले आहे.

ऑगस्ट 2022 मध्ये सुरूवात झाल्यापासून, अकासा एयरने 3.5 दशलक्षाहून अधिक महसूल प्रवासी नेले आहेत आणि मुंबई, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, कोची, दिल्ली, गुवाहाटी, अगरतळा, पुणे, लखनौ, गोवा, हैदराबाद, वाराणसी, बागडोगरा, भुवनेश्वर आणि कोलकाता या 16 शहरांना जोडणाऱ्या 35 अद्वितीय मार्गांच्या घोषित नेटवर्कसह 900 हून अधिक साप्ताहिक फ्लाईट्स चालवण्याचा टप्पा पार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.