Mumbai News : मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारित बांधकामाचा खर्च ३१ कोटींनी वाढला

गोरेगाव पश्चिम येथे पालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या मृणालताई गोरे विस्तारीत उड्डाणपुलाच्या विस्तारित बांधकामाचा खर्च ३१ कोटींनी वाढला आहे.
money
money sakal
Updated on
Summary

गोरेगाव पश्चिम येथे पालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या मृणालताई गोरे विस्तारीत उड्डाणपुलाच्या विस्तारित बांधकामाचा खर्च ३१ कोटींनी वाढला आहे.

मुंबई - गोरेगाव पश्चिम येथे पालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या मृणालताई गोरे विस्तारीत उड्डाणपुलाच्या विस्तारित बांधकामाचा खर्च ३१ कोटींनी वाढला आहे. त्यामुळे या पुलाचा एकूण खर्च २४० कोटींवर गेल्याची रस्ते व पूल खात्याच्या अधिका-यांनी दिली.

गोरेगाव येथील या उड्डाणपूलाचे राम मंदिर रोड ते रिलीप रोडपर्यंत एस व्ही रोड लगत विस्तारीकरण केले जाते आहे. वाढीव कामामुळे याचा खर्च २४० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या पुलाचे बांधकाम दोन नदीच्या पात्रातून करण्यात येत असल्याने यासाठी वापरण्यात आलेल्या स्ट्रक्चरल स्टील बांधकामामुळे तसेच पुलाच्या बांधकामामध्ये मलवाहिनी बाधित झाल्याने त्याची नवीन जोडणी टाकण्यात आल्याने हा खर्च वाढला आहे. वाढीव कामांमुळे सल्लागारालाही आणखी ६६ लाख रुपये पालिका प्रशासनाला मोजावे लागणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम २०१६ मध्ये पूर्ण झाले. या पुलाच्या बांधकामासाठी २५५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या पुलाच्या बांधकामानंतर राम मंदिर रोड ते रिलीप रोडपर्यंत एस व्ही रोड लगत विस्तारीत बांधकामाला प्रत्यक्षात मार्च २०१९ पासून सुरुवात झाली. या विस्तारीत पुलाच्या बांधकामामध्ये जागेची अडचण आणि जलद बांधकाम करण्यासाठी या उड्डाणपुलाचे सुपर स्ट्रक्चर एमएस स्ट्रक्चरल स्टीलने बांधण्यासाठी डिझाईन केले आहे. हा पूल अत्यंत वर्दळीचा रस्ता असलेल्या एस व्ही रोड, राम मंदिर रोड आणि रिलीफ रोड या जंक्शनवरून जात आहे.

पुलाचे बांधकाम करताना भूमिगत आवश्यक अशा पाण्याच्या पाईप लाईन, एचटी आणि एल टी केबल्स, एमजीएल वाहिन्या, जल वाहिन्या आदी स्थलांतरी पायाभरणीचे कामे करण्यात येत आली. वालभट नदी (राम मंदिर रोड) आणि ओशिवरा नदी (एस व्ही रोड) या दोन प्रमुख नद्यांवर ओलांडून हा पूल जात आहे. त्यामुळे या नद्यांच्या परिसरातील स्ट्रक्चरल स्टील बांधकामाला प्रचंड गंज चढू शकते तसेच या नदीवर भरती व ओहोटीचा परिणाम होत असल्यानेही स्ट्रक्चरल स्टील बांधकाम गंजू शकते. त्यामुळे गंज टाळण्यासाठी तसेच स्ट्रक्चरल स्टीलचे आर्युमान वाढवण्यासाठी या उड्डाणपूलाच्या सुपर स्ट्रक्चरमध्ये स्टेनलेस स्टील गर्डर टाकण्याचा निर्णय रस्ते व पूल विभागाने घेतला आहे.

राम मंदिर रोडच्या वालभट नदीवर तसेच एस व्ही रोडच्या ओशिवरा नदी वरील भागात सुपर स्ट्रक्चरमध्ये स्टेनलेस स्टील गर्डर टाकले गेले, तसेच पुलाचे बांधकाम करताना ९00 मी. मी. व्यासाची जुनी मलनि:सारण वाहिनी नव्याने टाकण्याचाही निर्णय घेतला. तसेच इतर बाबींचाही समावेश करण्यात आला त्यामुळे खर्च वाढला असे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले. या विस्तारीत पुलाच्या बांधकामासाठी विविध करांसह २०९. ६४ कोटी रुपयांचे कंत्राट मंजूर केले होते, परंतु हे कंत्राट काम ३१ कोटींनी वाढून आता २४०. ०६ कोटी रुपये एवढे झाल्याची माहिती या विभागाने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.