Mumbai Mulund Hit And Run Case: मुलुंडमध्ये पहाटे चार वाजता एका बीएमडबल्यू कारने रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिली आहे. त्यानंतर चालक पसार झाला आहे. यात एक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची परिस्थिती गंभीर आहे.
मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते पहाटे चार वाजताच्या दरम्यान मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवर जवळ बॅनर लावत होते. अचानक भरधाव वेगात एक बीएमडब्लू कार कँपस हॉटेल कडून मुलुंड पूर्व ते वेस्टच्या ब्रिजकडे जात असताना या दोघांना जोरदार धडक दिली.