Mumbai : नववर्षानिमित्त जीवाचा गोवा करण्यासाठी मुंबईकर सज्ज !

गोवा जाणाऱ्या मेल -एक्सप्रेस गाड्या हाऊसफुल्ल !
Mumbai
Mumbai esakal
Updated on

मुंबई : जागतिक पर्यटन नगरी असलेल्या गोव्यात नाताळसह सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी गोव्यात जाण्याचा प्लॅन केला आहे. त्यामुळे वंदे भारतसह अनेक मेल -एक्सप्रेस गाड्याचे आरक्षण हाऊसफुल झाले आहे. तसेच मध्य रेल्वेने अगोदरच गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी लक्षात घेत पनवेल ते मडगावदरम्यान १४ विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात जाणाऱ्या पर्यटक आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहेत.

Mumbai
Makeup Tips : चाळीशीतील महिलांनो, मेकअप करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

नाताळ आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मुंबईकरांनी आतापासून कोकणातील समुद्र किनाऱ्यावर जाण्याचा प्लॅन तयार केला आहे. अनेकानी रेल्वे तिकिटांपासून ते हॉटेल रेस्टोरन्टचे बुकिंग करणे सुरु केले आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या मेल- एक्सप्रेस गाड्याचे आरक्षण हाऊस फुल्ल झाले आहे. वंदे भारत, तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी या नियमित गाड्यांसह विशेष गाड्यांचे बुकिंग १२५ टक्क्यांचे पुढे गेले असल्याचे समोर आले. वंदे भारतचे आरक्षण १३७ टक्क्यांवर, तेजस एक्सप्रेसचे १२२ टक्क्यांवर, जनशताब्दी १२० टक्क्यावर गेले आहे, तर विशेष गाड्यांचे आरक्षण १३९ टक्क्यांवर गेले आहे. गाव्याला जाणार्‍या प्रवाशांची संख्या बघता मध्य रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याची तयारीला लागली आहे.

Mumbai
Career Tips : वारंवार सर्च करूनही जॉब मिळत नाही? मग,'या' स्ट्रॅटेजीचा करा वापर

प्रतीक्षा यादी वाढतेय !

कोकण मार्गावर धावणाऱ्या नियमीत गाड्यासह विशेष गाड्यांची प्रतीक्षा यादी दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यामुळे अनेकांना रेल्वेचे आरक्षित असान मिळणार नसल्याची भीती आहे. त्यामुळे गोव्यात जाणाऱ्या गाड्याची आणखी संख्या वाढविण्याची मागणी प्रवासी आणि पर्यटकांकडून करण्यात येत आहे.

विशेष गाड्या हाऊसफुल्ल होण्याचा मार्गावर

गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने पनवेल ते मडगाव आणि नागपूर ते मडगाव दरम्यान १४ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे. नागपूर मडगाव या गाडीचे २२ ते ३० डिसेंबर या कालावधीत सरासरी १३९ टक्के एवढे आगाऊ आरक्षण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-थिवीम दरम्यान चालवण्यात येणार्‍या गाडीचे ९५ टक्के, पुणे-करामाळी १२४ टक्के, तर पनवेल-करमाळी या गाडीचे ११० टक्के आगाऊ आरक्षण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.