Parking App : मुंबईत मिळणार आता अॅपद्वारे पार्किंग!

मुंबईत पार्किंगचा मोठा जटिल प्रश्न आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी आता अॅप उपलब्ध होणार आहे.
Mumbai Parking App
Mumbai Parking AppSakal
Updated on
Summary

मुंबईत पार्किंगचा मोठा जटिल प्रश्न आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी आता अॅप उपलब्ध होणार आहे.

मुंबई - मुंबईत पार्किंगचा मोठा जटिल प्रश्न आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी आता अॅप उपलब्ध होणार आहे. वाहनतळांची उपलब्धता, बुकिंग आणि शुल्क भरण्याची सुविधा इच्छुकांना अॅपवर मिळणार आहे. शहर आणि उपनगरात वाहन व्यवस्थापन आराखड्याचा विस्तार करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

पालिकेने वाहनतळाचे नियमन करण्यासाठी १५ तज्ज्ञांची समिती २०१९ मध्ये तयार केली; मात्र कोरोना टाळेबंदीमुळे त्यांचे काम पुढे जाऊ शकले नाही. १८ जानेवारी २०२१ रोजी पुन्हा समिती नियुक्त करण्यात आली. समितीचे प्रमुख म्हणून सेवानिवृत्त ‘आयएएस’ अधिकारी रामनाथ झा आणि त्यांच्याबरोबर काही नगर नियोजनतज्ज्ञ, वाहतूक धोरण आणि सामाजिक विषयांचे काही प्रतिनिधी सभासद यांच्याकडून व्यापक अशी दाटीवाटीच्या मुंबई शहरासाठी वाहनतळ योजना ठरवण्यात आली आहे. पालिकेच्या व सरकारी कार्यालयांची पार्किंगसंबंधी सर्व खाती, पोलिससंबंधी खाते, रस्ता वाहतूक प्राधिकरण (आरटीओ) आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसीएल) यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेले वाहतूक प्राधिकरण स्थापन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

पार्किंग व्यवस्थापन होणार सुलभ

मुंबईतील सर्व २४ प्रभागांनुसार प्रत्येक वॉर्डात वाहतूक व्यवस्थापन आराखडा (पीएमपी) तयार केला जाईल. त्यात रस्त्यावरील व रस्त्याबाहेरच्या पार्किंगकरिता जास्तीत जास्त सोईची अशी पार्किंग व्यवस्था असेल. अॅपवर वाहनतळांची उपलब्धता, बुकिंग आणि शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. सुरक्षा सुलभता आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने मुंबई वाहनतळ प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.