ओमिक्रॉनला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा अ‍ॅक्शन प्लॅन!

omicron
omicronesakal
Updated on

मुंबई : दक्षिण आफ्रिकेत (south africa) कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने (omicron variant) धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉन मिळाल्यानंर जगभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. ओमिक्रॉनला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. नेमका काय आहे हा अ‍ॅक्शन प्लॅन? वाचा सविस्तर

परदेशातून येणा-या प्रवाशांसाठी पाच सूत्री अ‍ॅक्शन प्लॅन

दक्षिण आफ्रिकेनंतर नेदरलँडने सुद्धा १३ जण ऑमिक्रॉनच्या विळख्यात सापडले आहेत. ब्रिटेनमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून दक्षिण आफ्रिकेत लॉकडाऊनला विरोध केला जात आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीन व्हेरियंट मिळाल्यानंतर संपूर्ण जगभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. जर्मनीमध्ये तीन जणांना व्हेरियंटचं संक्रमण झालंय. तर मॉर्डना व्हॅक्सीनचे प्रमुख मेडिकल ऑफिसर डॉक्टर पॉल बर्टनने ऑमिक्रॉन व्हेरियंट धोकादायक असल्याचं सांगितलं. अशातच ओमीक्राँनला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. दरम्यान परदेशातून येणा-या प्रवाशांसाठी पाच सूत्री अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. धोकादायक देशामधून येणा-या प्रवाशांवर ठेवणार बारीक नजर येणार आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली हा अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे.

काय आहे एँक्शन प्लाँन ?

एअरपोर्ट सीईओ कडून हायरिस्क आणि रिस्क देशातून येणा-या प्रवाशांची यादी आपात्कालीन कक्षाला पाठवली जाणार

प्रवाशांची यादी सोपी व्हावी यासाठी साँफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली आहे.

आपात्कालीन कक्षाकडून मुंबई महापालिकेच्या 24 वॉर्डातील वॉर रूमला प्रवाशांच्या पत्त्यासह ठवली जाणार

वॉर रूम मधून प्रवाशांची सतत 7 दिवस संपर्क ठेवण्यात येणार.

विलगीकरणाचे नियम प्रवासी नीट पाळत आहे कि नाही यांची खबरदारी घेतली जाणार.

वॉर रूमकडून प्रत्येक वॉर्डात 10 रुग्णवाहिका तयार ठेवणार

महापालिकेची पथकेही बनवली जाणार

महापालिकेची पथकं प्रवाशांच्या घरी जाऊन तपासणी करणार

प्रवासी राहत असलेल्या सोसायटीला पत्र दिलं जाणार

प्रवासी विलगीकरणाचे नियम पाळतो की नाही यावर वॉच ठेवला जाणार

omicron
लसीकरणाच्या बोगस प्रमाणापत्रांचा सुळसुळाट! आरोग्य विभागावर 'वॉच'
omicron
शेतकऱ्यांच्या जमावापुढे कंगनाने घेतलं नमतं; माफी मागून जिंकली मनं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.