मुंबई महापालिकेचा अंदाज चुकला; कोट्यावधीचा फटका

महानगर पालिकेने पवई पासून घाटकोपर पर्यंत 4.36 किलोमिटर लांबीचा जलबोगदा खोदण्याचे काम 2012 मध्ये सुरु केले.
Mumbai Municipal Corporation
Mumbai Municipal CorporationSakal
Updated on
Summary

महानगर पालिकेने पवई पासून घाटकोपर पर्यंत 4.36 किलोमिटर लांबीचा जलबोगदा खोदण्याचे काम 2012 मध्ये सुरु केले..

मुंबई - पवई ते घाटकोपर दरम्यान जलबोगदा (Water Tunnel) खोदताना टनल बोरींग मशिन (Boaring Machine) अडकल्याने हे काम गेल्या अडीज वर्षांपासून ठप्प (Work Stop) पडले आहे. भुगर्भाचा अंदाज चुकल्याने महानगर पालिकेला (Mumbai Municipal) हा फटका बसला आहे. आता या अर्धवट कामासाठी महानगर पालिकेला 147 कोटी 68 लाख रुपयांचा खर्च (Loss) कंत्राटदाराला द्यावा लागणार आहे. अशी माहिती प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर मांडली आहे. तसेच, पुढील कामासाठी नव्याने निवीदा मागविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष 223 कोटी 15 लाख रुपयांच्या मुळ खर्चात आता काही पटीने वाढ होण्याची शक्यता आहे.

महानगर पालिकेने पवई पासून घाटकोपर पर्यंत 4.36 किलोमिटर लांबीचा जलबोगदा खोदण्याचे काम 2012 मध्ये सुरु केले. हे काम 2016 मध्ये पुर्ण होणे अपेक्षीत असताना भुस्तराअंतर्गत प्रतिकुल परीस्थीतीमुळे कामात अडथळे आले. तर, ऑगस्ट 2019 मध्ये पवई येथील शिपींग कार्पोरेशन जवळ खोदकाम सुरु असताना जमिन खचून खड्डा निर्माण झाला. त्यामुळे हे मशिन जमिनीखालील चिखलात अडकले. तेव्हा पासून हे मशिन अडकून आहे. जगात दोन ठिकाणीच असा प्रकार घडला आहे. पवई पासून 1 हजार 206 मिटरचे काम या काळात पुर्ण झाले होते.

Mumbai Municipal Corporation
रेकॉर्डब्रेक थंडीमुळे मुंबईकर हैराण

या नुकसनापोटी पटेल इंजिनिअरींग कंपनीने 167 कोटी रुपयांचा दावा केला होता. आता पर्यंत झालेले काम आणि मशिनचे नुकसान या पोटी हा दावा करण्यात आला होता. या दाव्याच्या बदल्यात पालिका संबंधीत कंत्राटदाराला 147 कोटी 68 लाख रुपये देणार आहे. तसेच, नवा कंत्राटदार नियुक्त होई पर्यंत कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारीही संबंधीत कंत्राटदाराची आहे. शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत यावर निर्णय होणार आहे.

प्रशासनाने आता पुढील काम करण्यासाठी नवा कंत्राटदार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी निवीदा प्रकि्रया सुरु करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, पुढील कामांसाठी पुन्हा कोट्यावधीचा खर्च महानगर पालिकेला करावा लागणार आहे.

-पवई पासून घाटकोपर पर्यंत 4.36 किलोमिटरच्या लांबीसाठी 223 कोटी 15 लाख रुपयांचा खर्च होणार होता.

-आता पर्यंत 1.20 किलोमिटरचे काम झाले असून कंत्राटदाराला 147 कोटी 68 लाख रुपये द्यावे लागणार.

-मशिन अडकली त्या ठिकाणचा भुगर्भाचा स्तर ज्वालामुखीच्या राखे पासून बनलेला आहे.

-अशी कामे करण्यापुर्वी जमिनीचा स्तर तपासून त्यानुसार आराखडा तयार केला जातो.

-यात पालिकेचा अंदाज चुकल्याने हा अपघात घडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.