मुंबई महापालिकेची वास्तू पर्यटकांसाठी खुली होणार; एमटीडीसी-पालिकेमध्ये सामंजस्य करार

मुंबई महापालिकेची वास्तू पर्यटकांसाठी खुली होणार; एमटीडीसी-पालिकेमध्ये सामंजस्य करार
मुंबई महापालिकेची वास्तू पर्यटकांसाठी खुली होणार; एमटीडीसी-पालिकेमध्ये सामंजस्य करार
Updated on

मुंबई : महानगरपालिका मुख्यालयाची ऐतिहासिक वास्तू अवघ्या जगाला परिचित आहेच. आता या वास्तूचे सौंदर्य प्रत्यक्षात इमारतीत जाऊन पर्यटकांना पाहणे शक्‍य होणार आहे. मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असे उद्‌गार राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी काढले आहेत.

मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय असलेली पुरातन व ऐतिहासिक वास्तू पर्यटकांना पाहता यावी, यासाठी पुरातून वास्तू पाहणीबाबत महानगरपालिका व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यादरम्यान आज सायंकाळी सामंजस्य करार झाला. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह पर्यटन व उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या विशेष उपस्थितीत हा समारंभ पालिका सभागृहात झाला. मुंबई पालिका प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्‍विनी भिडे, तर राज्य सरकारच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. 

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, महानगरामध्ये पर्यटनवाढीची प्रचंड क्षमता आहे. मुंबई महानगराचा कारभार या वास्तूतून कसा चालवला जातो, लोकप्रतिनिधी कामकाज कसे करतात, ते पाहण्यासाठी आता पर्यटक या इमारतीमध्ये येऊ शकतील. कोरोनाकाळात महापालिकेने केलेल्या कामकाजाचे जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बॅंक यांच्यासह जागतिक स्तरावरच्या प्रसारमाध्यमांनीही कौतुक केले आहे. अशा या संस्थेची ही ऐतिहासिक वास्तू अनेक घटनांची, महत्त्वाच्या क्षणांची साक्षीदार आहे. या वास्तूचे अंतर्बाह्य सौंदर्य पाहून त्याची महती आता पर्यटकांना अनुभवता येईल. 

मुंबईत येणारा पर्यटक दिवसभर वेगवेगळ्या पर्यटन उपक्रमांत गुंतलेला पाहिजे. त्यासाठी वैविध्यपूर्ण उपक्रम महत्त्वाचे आहेत. महानगरपालिका मुख्यालयाला दिलेली भेट पर्यटकांना तर मार्गदर्शक ठरेलच; सोबत इतर राज्य, शहरे यांनाही अशा प्रकारचा उपक्रम सुरू ठरण्यासाठी ते मार्गदर्शक ठरेल. 
- ए. एस. चहल, आयुक्त, मुंबई महापालिका

---------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.