मुंबई: महापालिकेची मुदत संपल्यामुळे सोमवारी पालिका विसर्जीत होणार आहे. मात्र, शेवटच्या दिवशी मुंबईतील महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत स्थायी समितीत निर्णय होणार आहेत. स्थायी समितीत सुमारे साडे तीन हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचे प्रस्ताव मान्यतेसाठी मांडले गेले आहेत. गेल्या बुधवारी झालेल्या बैठकीत तब्बल दोन हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव मांडले होते. त्यातील दीड हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव राखून ठेवण्यात आले होते. असे सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावांचा निर्णय सोमवारी होणार आहे.
८ मार्चपासून महापालिका विसर्जीत होऊन कारभार प्रशासनाच्या हाती जाणार आहे. त्यापूर्वी सोमवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत २०० हून अधिक प्रस्ताव मांडण्यात आले. या सर्व प्रस्तावांचे मूल्य साडेतीन हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगण्यात आले. महापालिकेची मुदत ७ मार्चच्या रात्री संपणार आहे. त्यामुळे बुधवारी होणारी स्थायी समितीची बैठक शेवटची असेल, अशी शक्यता होती. मात्र, पालिकेच्या नियमानुसार स्थायी समितीची दर आठवड्याला बैठक घेणे बंधनकारक आहे. या नियमांचा वापर करून सोमवारी शेवटची बैठक घेण्यात येणार आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत १८० प्रस्ताव मांडण्यात आले होते. त्यातील ९५ प्रस्ताव राखून ठेवण्यात आले होते. त्या प्रस्तावांवरही सोमवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार आहे.
२३०० कोटींचे प्रस्ताव
सोमवारच्या बैठकीत रुग्णालय आणि पाणी पुरवठ्यासंदर्भातील तब्बल २ हजार ३०० हून अधिक रकमेचे प्रस्ताव मांडण्यात आले आहेत. त्याचबरोबर नाल्यांची दुरुस्ती, रस्त्यांची कामे, तसेच इतर विकास कामांचेही प्रस्ताव आहेत.
विविध प्रकल्पांसाठी निधी
नाहूर येथील सुपरस्पेशालिटी रुग्णालय- ६७० कोटी
कांदिवली शताब्दी रुग्णालय विस्तार -४३२ कोटी
नायर रुग्णालयाचा विस्तार - २९६ कोटी
पवई घाटकोपर जलबोगदा - ५१५ कोटी
मलबारहिल टेकडी जलाशय - ५८९ कोटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.