Mumbai : मुंबई महापालिकेच्या अभियंत्याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत मुंबई महानगरपालिकेत कार्यरत अभियंत्यास लाच स्वीकारताना शनिवारी संध्याकाळी रंगेहात अटक
Mumbai Municipal Corporation engineer arrested red-handed while accepting bribe crime
Mumbai Municipal Corporation engineer arrested red-handed while accepting bribe crimeesakal
Updated on

मुंबई : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत मुंबई महानगरपालिकेत कार्यरत अभियंत्यास लाच स्वीकारताना शनिवारी संध्याकाळी रंगेहात अटक केली आहे. सुनील भारंबे असे आरोपी अभियंताचे नाव असून तो मुंबई महापालिकेच्या ए वॉर्डमध्ये कार्यरत होता.

या प्रकरणात तक्रारदार त्यांच्यासोबत त्यांचे मित्राच्या चर्चगेट भागातील हुक्का पार्लर साठी लायझनिंगचं काम करतात. पार्लर साठी संबंधित शासनाच्या परवानग्यांचे काम तक्रारदार पाहतात. 26 एप्रिल रोजी काही महापालिकेच्या अधिकाऱ्यामार्फत हुक्का पार्लरची पाहणी करण्यात आली. त्यानंतर तक्रारदाराची आरोपी अभियंताशी भेट झाली.

हुक्का पार्लरमध्ये अधिकचा पोटमाळा असून हा फोटो मला बेकायदेशीर असल्याचा दावा अभियंत्याने तक्रारदाराकडे केला. याबाबत कारवाई न करण्यासाठी अभियंताने पाच लाख रुपयांची लाच मागितली. अखेर तडतुडेंती सौदा तीन लाख रुपयात ठरला. 6 एप्रिल शनिवारी संध्याकाळी चर्चगेट स्टेशन परिसरात अभियंत्याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले आणि अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()