Mumbai Pollution : लोकप्रतिनिधी प्रचारात व्यस्त, नालेसफाईच्या कामात निष्काळजीपणा

Municipal Corporation : महापालिकेने कंत्राटदारांवर केली दंडात्‍मक कारवाई ; ठोठावला ३० लाख ८३ हजार रुपयांचा दंड
नालेसफाईत निष्काळजीपणा झाल्याने महापालिकेने कंत्राटदारावर लाखोंचा दंड ठोठावला.
नालेसफाईत निष्काळजीपणा झाल्याने महापालिकेने कंत्राटदारावर लाखोंचा दंड ठोठावला.esakal
Updated on

Mumbai : दरवर्षी पावसाचे प्रत्‍यक्ष आगमन होण्‍यापूर्वी महापालिकेच्‍या पर्जन्‍य जलवाहिन्‍या विभागाच्‍या माध्‍यमातून महानगरातील मोठ्या नाल्‍यांमधून गाळ काढला जातो. निवडणुकींमुळे या कामावर लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे.

नालेसफाईत निष्काळजीपणा झाल्याने महापालिकेने कंत्राटदारावर लाखोंचा दंड ठोठावला.
Pre-monsoon Rain : महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांत आज बरसणार पूर्वमोसमी पावसाच्या सरी; नागपूर, भंडारा, गोंदियात गारपिटीचा इशारा

सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी प्रचारामध्ये व्यस्त आहेत. दुसरीकडे नालेसफाईच्या कामात निष्‍काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर महापालिकेने दंडात्‍मक कारवाई केली आहे. यात वेगवेगळ्या कंत्राटदारांना ३० लाख ८३ हजारांचा दंड ठोठावला आहे.

पावसाळा तोंडावर आला की साधारणपणे मे महिन्यात नालेसफाईच्या कामावरून राजकारण्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी ऐकायला मिळायच्या. अनेकदा सत्ताधारी आणि विरोधकांकडून नालेसफाईच्या कामांची पाहणी केली जाते. यंदा मात्र हे काम पाहण्यासाठी एकही राजकारणी फिरकलेला नाही. सत्ताधाऱ्यांसह विरोधकही प्रचारात गुंतलेले आहेत.

दुसरीकडे नालेसफाईच्या कामांमध्ये निष्काळजीपणा होत असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. पालिका प्रशासनाला १५ मार्च ते २९ एप्रिलदरम्यान मोठ्या नाल्‍यातून गाळ काढण्‍याच्‍या कामांपैकी ३१ ठिकाणी कामात निष्‍काळजीपणा केल्याचे आढळले आहे. त्यामुळे कंत्राटदारांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली असून ३० लाख ८३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयुक्त भूषण गगराणी यांनी नुकतीच नालेसफाईच्या कामांची पाहणी केली.

नालेसफाईत निष्काळजीपणा झाल्याने महापालिकेने कंत्राटदारावर लाखोंचा दंड ठोठावला.
Drainage Cleaning News : शहरात 2 दिवसांत सुरू होणार नाले सफाई

आतापर्यंत ६१ टक्के काम पूर्ण

मुंबईतील पर्जन्‍यमान आणि पावसाची तीव्रता याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन, नाल्‍यांमधून किती गाळ उपसणे आवश्‍यक आहे, याचा अभ्‍यास करून गाळ उपशाचे उद्दिष्ट निश्चित करण्‍यात येते. यंदा पावसाळ्यापूर्वी एकूण १० लाख २१ हजार ७८२ मेट्रिक टन गाळ काढण्‍याचे उद्दिष्ट निश्चित करण्‍यात आले आहे. पैकी आतापर्यंत सहा लाख २३ हजार ६३१ मेट्रिक टन म्‍हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या ६१.०३ टक्‍के गाळ काढण्‍यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

नागरिकांच्या प्रतिक्रिया :

पूर्व उपनगरात नाल्यांची स्वच्छता फारशी झाल्याचे दिसत नाही. पावसाळ्यात याचा फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबई बुडाली तरी चालेल, पण निवडणूक जिंकलो पाहिजे या मानसिकतेमध्ये लोकप्रतिनिधी आहेत.

- संतोष दौंडकर, सामाजिक कार्यकर्ते

कंत्राटदारांकडून व्यवस्थित नालेसफाई करून घेणे, त्या कामावर वॉच ठेवणे हे लोकप्रतिनिधींचे काम आहे.

ज्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे

दिसते. बरेच अधिकारीही निवडणूक ड्युटीवर आहेत.

- गॉडफ्रे पिमेंटा, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.