Mumbai Garbage : महापालिका खासगी सोसायट्यांकडून ओला सुका कचरा गोळा करणार

मुंबई महानगरपालिकेकडून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्याच्या मोहिमेला पुन्हा वेग येणार आहे.
Garbage Vehicle
Garbage VehicleSakal
Updated on
Summary

मुंबई महानगरपालिकेकडून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्याच्या मोहिमेला पुन्हा वेग येणार आहे.

मुंबई - मुंबई महानगरपालिकेकडून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्याच्या मोहिमेला पुन्हा वेग येणार आहे. मुंबईतील खासगी सोसायटीच्या ठिकाणापासून महापालिका हा ओला सुका कचरा गोळा करण्याची सुरूवात करणार आहे. हा कचरा गोळा करण्यासाठी वाहनांची व्यवस्थादेखील पालिकेकडून करण्यात येईल. मुंबई महापालिकेचा ५०० सोसायट्यांकडून हा कचरा गोळा करण्याचा मानस आहे. माझी मुंबई स्वच्छ मुंबई अभियानाच्या निमित्ताने त्यांनी जी नॉर्थ येथील कार्यक्रमामध्ये ही माहिती दिली.

ओला आणि सुका कचरा गोळा करून महापालिकेच्या कांजुर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या ठिकाणी नेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांकडून वाहनाची व्यवस्था महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग करणार आहे. त्यामुळे सोसायटीने वर्गीकरण केलेला कचरा हा वेगवेगळा करून वाहतूक करून नेण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व कार्यालयात ही सुविधा देण्यात येणार आहे. आठवड्याभरातच कचरा वर्गीकरण करूनच खासगी सोसायटीकडून गोळा करण्यात येईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून या कचऱ्याचे कंपोस्टिंग करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिकेकडून ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण करण्यासाठी येत्या दिवसांमध्ये वेगवेगळे डबेही देण्यात येणार आहेत. मुंबई महापालिकेचे परिमंडळ २ चे उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी ही माहिती दिली. स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्या मागणीनुसार ओला आणि सुका कचरा वर्गीकरणासाठी स्वतंत्र डब्यांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसारच कचरा गोळा करण्यासाठी डबे पुरविण्यात येतील असे बिरादार यांनी सांगितले.

मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दादरमध्ये झालेल्या कार्यक्रमात ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाचा मुद्दा मांडला. मुंबईत ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करण्यात येते. परंतु पालिकेच्या वाहनांमधून मात्र हा कचरा एकत्रच नेला जातो असे निरीक्षण केसरकर यांच्या पत्नीने त्यांच्याकडे बोलून दाखवल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पालिकेनेही खासगी सोसायटीकडून हा कचरा वेगवेगळा नेला जाणार असल्याचे यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.