BMC
BMCsakal media

मुंबई महानगरपालिकेची नवी प्रभागरचना जाहीर

Published on
Summary

मुंबई महानगरपालिकेचा प्रभाग वाढीचा आराखडा आज जाहीर केला जाणार आहे.

मुंबई - बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका २०२२ चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यातील महापालिका कार्यक्रमही जाहीर झाला आहे. यात कोल्हापूर, नागपूरसह काही जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २०२२ मध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रारुप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिध्द करण्यासाठी आणि त्‍यावर हरकती व सूचना मागवण्‍यासाठी कार्यक्रम जाहीर करण्‍यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेचा प्रभाग वाढीचा आराखडा जाहीर केल्यानंतर प्रभागांची संख्या ९ ने वाढणार असून २२७ वरून ती २३६ इतकी होणार आहे. यामध्ये शहरात वरळी, परळ, भायखळा, तर पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसर, आणि पूर्व उपनगरात कुर्ला चेंबूर गोवंडीत प्रभाग वाढणार आहेत.

BMC
नितेश राणेंना कोर्टाचा झटका; पीए परबला 4 दिवसांची पोलिस कोठडी

एकूण जागांंच्या ५० टक्के महिला आरक्षण असणार आहे. २३६ एकूण जागा असून खुल्या प्रवर्गासाठी ११० जागा असणार आहेत. तर १०९ जागा महिलांसाठी राखीव असतील. एसी प्रवर्गासाठी ७ , एसी - 7, एसी महिला - 8, एसटी- 1, एसटी महिला-1 असं आरक्षण असणार आहे.

नऊ प्रभाग वाढले

2017 च्या निवडणुकीत मुंबईत 227 प्रभाग होते. तर,यंदा 236 प्रभाग करण्यात आले आहे. मुंबई शहर विभागात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्‍चिम 3 असे नऊ प्रभाग वाढवण्यात आले आहेत.

आता काय हाेणार

1 फेब्रुवारी - निवडणुक प्रभागांचा सीमा दर्शवणारी प्रारुप अधिसुचना शासन राजपत्रात प्रसिध्द करणे.

1 ते 14 फेब्रुवारी - प्रारुपावर हरकती व सुचना मागविणे

16 फेब्रुवारी - हरकती व सुचनांचे विवरण पत्र राज्य निवडणुक आयोगाला सादर करणे

26 फेब्रुवारी - सुचना व हरकतींची सुनावणी.

2 मार्च - प्राधिकृत अधिकाऱ्यानी केलेल्या शिफारशी विहीत नमुन्यात नमूद करुन विवरणपत्र राज्य निवडणूक आयाेगास सादर करणे.

BMC
Budget 2022 : अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा वाचा एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.