Latest Mumbai Murder News: दारू पिण्यासाठी कमी पैसे दिल्याने शिव्या देणाऱ्या वडिलांची मुलानेच रागाच्या भरात हत्या केली. नागझरी- बऱ्हाणपूर रस्त्यावरील बोरशेती गावातील अस्वलीपाड्यात बुधवारी दुपारी ही घटना घडली.
घराच्या पाठीमागे भातकापणीचे काम करून घरी आलेल्या लक्ष्मण गोरखना याने दारू पिण्यासाठी मुलाकडे पैसे मागितले; पण मुलाने फक्त दहाच रुपये दिल्याने रागावलेल्या लक्ष्मणने मुलगा सुरेशला शिव्या द्यायला सुरुवात केली. तसेच, दिवाळीचा सण असताना आई-वडिलांकडे लक्ष देत नसल्याची तक्रार केली.