कोविडचं संकट! मुंबईतील नायर रुग्णालयातील डॉक्टर आंदोलनाच्या पवित्र्यात

nair.jpg
nair.jpg
Updated on

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुढच्या काही दिवसात बेडस, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स या सुविधा अपुऱ्या पडू शकतात. त्यामुळे मुंबईत प्रशासनाने पालिका रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी बेड वाढवण्यास सुरुवात केली आहे. पण महापालिकेच्या नायर रुग्णालयात या निर्णयाला मार्डच्या डॉक्टरांकडून विरोध होताना दिसतोय. 

नायर रुग्णालयात कोरोनाबाधित नसलेल्या रुग्णांच्या खाटा जबरदस्तीने रिकाम्या करुन, कोविड पेशंटची व्यवस्था केली जातेय. अप्रशिक्षित डाँक्टरांवर कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी दबाव टाकला जातोय. नायरच्या अधिष्ठातांसोबत डाँक्टरांची बैठक सुरू आहे. मागण्या मान्य न झाल्यास नायरमधील डॉक्टरांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

नायरमध्ये किडनीचा आजार असलेल्या रुग्णांवर डायलसिस केले जाते. त्याशिवाय कॅन्सरग्रस्त रुग्णांवर केमोथेरपीनेही उपचार केले जातात. पण सध्या अन्य आजारांपेक्षा कोरोनाबाधितांवर उपचार करण्यावर भर दिला जात आहे. त्या दृष्टीने नायर रुग्णालयात तयारी सुरु आहे. पण हा निर्णय घेताना, डॉक्टरांना विश्वासात न घेतल्याने त्यांच्या मनात नाराजीची भावना आहे. मार्डचे हे डॉक्टर आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 

(संपादन - दीनानाथ परब)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()