Mumbai : राष्ट्रवादीत कोणतेही गट नाहीत; मनसे आमदार राजू पाटील यांनी स्पष्टच सांगितले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भविष्यात केंद्रात काही मंत्री पद राष्ट्रवादीला मिळतील असे सांगितले होते.
MLA Raju Patil
MLA Raju PatilSakal
Updated on

डोंबिवली - पुणे येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हस्तांदोलन केले. राज्यात राष्ट्रवादीत गट तट निर्माण झाले आहेत असे चित्र दिसत असतानाच कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राष्ट्रवादीत कोणतेही गट तट नाहीत असे स्पष्टच सांगून टाकले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भविष्यात केंद्रात काही मंत्री पद राष्ट्रवादीला मिळतील असे सांगितले होते, ती वेळ जवळ येत चालली आहे असे वाटते असे म्हणत एका वेगळ्याच चर्चेला वाट करुन दिली आहे.

MLA Raju Patil
Jaipur-Mumbai Exp Firing: गोळीबार, चेन पुलिंग अन् अटक; एक्स्प्रेसमध्ये नेमकं काय घडलं? रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे फडणवीस व शिंदे सरकार मध्ये सहभागी झाले. यानंतर प्रथमच पूणे येथील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उप मुख्यमंत्री अजित पवार हे एका व्यासपीठावर उपस्थित दिसून आले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना हस्तांदोलन केले तर अजित पवार यांच्या खांद्यावर कौतुकाची थाप मारलेली सर्वांनी पाहिली.

सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असून या दरम्यान राष्ट्रवादीचे जयंत पाटील व सुनील तटकरे यांनी एकमेकांना मिठी मारलेले देखील सर्वांनाच माहित आहे.

MLA Raju Patil
Mumbai News : वांद्रे-वरळी सी-लिंकवर चालकाची समुद्रात उडी; नौदल तटरक्षक दलाकडून शोधमोहीम सुरू

हे प्रसंग पाहता राष्ट्रवादीत नेमकी फूट पडली आहे का ? असा प्रश्न मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना विचारला असता ते म्हणाले, पवार साहेबांविषयी मी काय बोलू ती खूप मोठी हस्ती आहे. मात्र गट वैगरे जे बोलले जात आहे मला वाटत नाही राष्ट्रवादी मध्ये गट पडलेले आहेत.

फक्त त्यांचे काय चालले आहे तेच कळत नाही. हाऊस मध्ये देखील तसे काही चित्र दिसले नाही. त्यांचे आमदार कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला बसत होते.

जयंत पाटील व सुनील तटकरे यांची मैत्री देखील आपण सर्वांनी पाहीली आहे. यामुळे राज ठाकरे हे जे बोलले की भविष्यात अजून काही मंत्रीपद केंद्रात या पक्षाला मिळतील. ते खरे असून ती गोष्ट जवळ येत चालली आहे असेच दिसते.

MLA Raju Patil
Mumbai News : वांद्रे-वरळी सी-लिंकवर चालकाची समुद्रात उडी; नौदल तटरक्षक दलाकडून शोधमोहीम सुरू

शहापूर दूर्घटनेवरुन सरकारचे टोचले कान

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटना आधी एका महिन्यात दोन वेळा ब्रीज पडले होते, त्यावेळेस चोकशी केली का ? त्या अभियंत्यावर काय कारवाई केली गेली ? असा सवाल उपस्थित करत आमदार पाटील म्हणाले, त्या वेळी कारवाई केली नाही म्हणून अशा दुर्घटना होतात. पुढे ही होत राहतील. शहापूर सह्याद्री महामार्गावर रात्रीच्या वेळेस पावसात काम सुरू होते.

त्यांच्याकडे रात्री काम करण्याची परवानगी होती का ? इथे रात्री अभियंते हजर होते का? याची चौकशी करावी. लोकांना दोन लाख, पाच लाख देऊन ही जबाबदारी झटकून होणार नाही. कामाच्या बाबतीत सतर्क राहिले पाहिजे अभियंतांवर दबाव असला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हे खात आहे, त्यामुळे बदनामी त्यांची ही होते.

असे अपघात टाळायचे असतील तर एसओपी बनवायला हवी आणि ते बनवतील. अपघात झाला तर पाच लाख जाहीर करतात. याच्या ने समस्या सुटणार नाही. मृतांच्या कुटुंबाला दिलासा मिळणार नाही.

समृद्धी महामार्गावर बसचा अपघात झाला, पाच लाख जाहीर केले तेच तुम्ही त्या गाड्या लेफ्ट साईडने कसे चालतील त्याच्यावर नियंत्रण बाकीच्या बाबीवरती नियंत्रण ठेवलं तर चालतील.दोन पाच लाख मदत देण्यात काही अर्थ नाही. तुम्ही जिथे दुर्घटना घडतात अशा ठिकाणचा आढावा घेण्यासाठी तुमच्याकडे जी यंत्रणा आहे ती राबवा असे सांगत सरकारचे कान टोचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.