मुंबई- ठाण्याला जोडणाऱ्या महत्वकांक्षी भुयारी मार्गाचे काम फास्ट ट्रॅकवर सुरू आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाणाऱ्या या मार्गासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने हिरवा कंदील दाखवलेला असतानाच अवघ्या चारच दिवसात केंद्रीय वन विभागानेही भुयारी मार्गाला परवानगी दिली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या दोन्ही परवानग्या मिळाल्याने भुयारी मार्गाच्या कामाला वेग येणार असल्याचे निश्चित झाले आहे.
मुंबईहून ठाण्याला जाताना वाहनधारकांना घोडबंदर रोडवर मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. तसेच एक- दीड तास वेळ आणि इंधन मोठ्या प्रमाणात खर्ची पडतो. त्यामुळे मुंबईकरांबरोबरच ठाणेकरांची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने एमएमआरडीएच्या माध्यमातून तब्बल १६ हजार ६०० कोटी रुपये खर्चून बोरिवली- ठाणे दरम्यान सुमारे १२ किलोमीटर लांबीचा दुहेरी भुयारी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्या पार्श्वभूमीवर सदर मार्गासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळवण्याचे काम सुरू आहे. नुकतीच राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने सदर प्रकल्पाला परवानगी दिली असून आज केंद्रीय वन विभागाने पहिल्या टप्प्यातील परवानगी दिल्याची माहिती एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मूखर्जी यांनी दिली.
असा असेल भुयारी मार्ग
बोरिवली- ठाणे हा दुहेरी भुयारी मार्ग एकूण १२ किलोमीटर लांबीचा असणार आहे. त्यापैकी ७.४ किमी लांबीचा बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तर ४.४३ किमीचा बोगदा ठाणे जिल्ह्यात असणार आहे.
तसेच बोगद्याच्या दोन्ही बाजूला सुमारे दीड किलोमीटर लांबीचा जोडमार्ग असणार आहे. सदरचा भुयारी मार्ग तयार झाल्यानंतर बोरीवलीहुन अवघ्या २० मिनिटात ठाण्याला पोहोचता येणार असल्याने वेळेची मोठी बचत होणार आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.