Mumbai Viral Video: मुंबईत दुचाकीवर 2 बकऱ्यांसह दोघांचा धोकादायक प्रवास, नेटकऱ्यांची कारवाईची मागणी

मुंबईतील रस्त्यांवरील एक विचित्र घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे
Mumbai Viral Video
Mumbai Viral VideoEsakal
Updated on

मुंबईतील रस्त्यांवरील एक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जी सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरली आहे. मुंबई शहरातील वाहनचालकांकडून वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. दुचाकीस्वार वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याची ही घटना आहे, एक दुचाकीस्वार त्याच्यासोबत स्कूटरवर बकऱ्या घेऊन जाताना दिसत आहे. (Latest Marathi News)

रस्त्याने त्यांचा पाठलाग करणार्‍या दुसर्‍या एका दुचाकीस्वाराने या घटनेचा व्हिडीओ बनवला आहे. गोरेगाव पश्चिम येथील बेस्ट कॉलनी रोड येथे दुचाकीस्वार बकऱ्या सोबत घेऊन जाताना दिसले. या दुचाकीवर दोन बकऱ्या आणि दोन व्यक्ती बसल्याचे दिसत आहेत. तर त्या बकऱ्यांचे दुचाकीवर जाताना मोठे हाल होत असल्याचे दिसत आहे. (Latest Marathi News)

वाहतूक नियमांचे उल्लंघन

दुचाकीस्वार आणखी एका व्यक्तीसह स्कूटरच्या मध्यभागी दोन बकऱ्या घेऊन जात होते. दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले नव्हते. त्यांच्या पाठीमागे जात असलेल्या दुसऱ्या दुचाकीस्वाराने या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण केले आणि संबधित अधिकाऱ्यांना दुचाकीस्वारावर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. वृत्तानुसार, गोरेगावमधील मुंबईतील बेस्ट कॉलनी रोडवर ही घटना आहे.

Mumbai Viral Video
G20 Summit: 'भारतात येण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन उत्सुक मात्र 'या' कारणाने आहेत नाराज

गुन्हेगारावर कडक कारवाई करण्याची मागणी

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्राणीप्रेमींचे मोठ्या प्रमाणावर लक्ष वेधून घेत आहे आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्या व्यक्तींवर आवश्यक कारवाई करण्याचे आवाहन करत आहेत. बाईकस्वार वाहतूक नियमांचे उल्लंघन करत आहे आणि त्यात हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे, एकावर एक शेळ्या घेऊन जाणे आणि एकाच स्थितीत राहणे हे प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960 चे उल्लंघन आहे. रस्त्यावर उपस्थित असलेल्या इतर लोकांचा जीव धोक्यात आणल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी, असे आवाहन नेटकऱ्यांनी केले आहे.(Latest Marathi News)

Mumbai Viral Video
Maharashtra Politics: पहिल्यांदाच फडणवीस झाले कॉर्नर, CM शिंदे-अजित पवारांचे जुळले सुर?

अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करत संबधित अधिकाऱ्यांना या प्रकरणाशी संबंधित गुन्हेगाराविरुद्ध कठोर कारवाई करण्याची विनंती करत आहेत. प्राणी कल्याण आणि रस्ता सुरक्षा या बाबी गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. ही चिंताजनक परिस्थिती असून तातडीने लक्ष देण्याची व कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.(Latest Marathi News)

त्यानंतर 'आम्ही संबंधित वाहतूक विभागाला आवश्यक कारवाईची माहिती दिली आहे', अशी माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.