मुंबई, ता. 5 : अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका ठेवलेल्या अभिनेता सोनू सूदने अखेर मुंबई महापालिकेकडे बांधकाम नियमित करण्यासाठी अर्ज करण्याची तयारी दर्शविली आहे. सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिकाही सोनूने आज मागे घेतली.
जुहू येथील सहा मजली शक्तिसागर निवासी इमारतीचे हॉटेलमध्ये परिवर्तन करताना त्याने महापालिकेची परवानगी घेतली नाही आणि नियमांचे उल्लंघन केले आहे, अशी नोटीस महापालिकेने त्याला बजावली आहे. याविरोधात त्याने दिंडोशी आणि उच्च न्यायालयात याचिका केल्या होत्या. मात्र न्यायालयाने त्याची याचिका नामंजूर केली आहे. त्यामुळे त्याने ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी यांच्या मार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. याचिकेवर आज सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारा सुनावणी झाली.
महत्त्वाची बातमी : हायकमांडकडून आला फोन, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची अधिकृत निवड
न्यायालयाने सोनूला याचिका मागे घेण्याचा सल्ला दिला असून तो महापालिकेकडे बांधकाम नियमित करण्यासाठी अर्ज करणार आहे, त्यामुळे याचिका मागे घेत आहोत असे रोहतगी यांनी खंडपीठाला सांगितले. खंडपीठाने यावर समाधान व्यक्त केले. हा योग्य सल्ला आहे आणि बरोबर देखील आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक जण ही भूमिका घेत नाही, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. महापालिकेने नियमाप्रमाणे यावर निर्णय घ्यावा असेही खंडपीठाने म्हटले आहे. तसेच निर्णय होईपर्यंत महापालिकेने कठोर कारवाई करु नये असे तोंडी निर्देश दिले.
महत्त्वाची बातमी : मानखुर्दमध्ये अग्नितांडव ! दाटीवाटीच्या भागातील स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग
सोनूने सहा मजली इमारत हॉटेलमध्ये वर्ग केली आहे. त्यासाठी इमारतीचा मूळ आराखडा बदलला आहे. यावर महापालिकेने दोन वर्षांपूर्वी नोटीस बजावली होती. तसेच पाडकामाची कारवाई देखील केली होती. महापालिका आकसाने कारवाई करत आहे, असे सोनूने याचिकेत म्हटले होते. लॉकडाऊनमध्ये या इमारतीत पोलिसांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती, असेही याचिकेत सांगितले आहे.
Actor Sonu Sood has finally shown readiness to apply to BMCfor regularization of construction
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.