मुंबई, ता. 26 : जानेवारी महिन्यात इंधनाच्या दराचा लक्षांक चढता असतांना दरम्यानचे काही दिवस इंधनाचे दर स्थिर झाले. मात्र, गुरुवार नंतर पुन्हा इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाली असून, गुरुवारी पेट्रोल 34 तर डिझेल 37 पैशाने वाढले तर शुक्रवारी पुन्हा पेट्रोल 29 तर डिझेल पैशाने वाढ झाल्याने मुंबईकरांसह वाहतुकदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच मुंबईकर आर्थिक संकटात आहे. त्यामध्ये दुसरीकडे इंधन दरात दिवसेंदिवस वाढच होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्यात इंधनाचे दर अस्थिर होते. तर या महिन्यात काही दिवसांपासून दर स्थित होते. मात्र, गेल्या दोन दिवसात सातत्याने दर वाढल्याने मुंबईत पेट्रोलचा, डिझेल उच्चांक गाठला आहे. पेट्रोलमध्ये 63 पैसे आणि डिझेलमध्ये 64 पैशाने वाढ झाली आहे. ही दरवाढ अशीच कायम राहिल्यास काहीच दिवसात मुंबईत पेट्रोल शंभरी पार करण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची बातमी : हायकमांडकडून आला फोन, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची अधिकृत निवड
सध्या मुंबईत पेट्रोलचे दर 93.49 रुपये तर डिझेल 83.99 रुपयांवर पोहचले आहे. यापूर्वी 18,19 जानेवारी रोजी पेट्रोलच्या दरात तब्बल 48 पैसे तर डिझेलदरामध्ये 53 पैशांची वाढ झाली होती. तर 20, 21 जानेवारी दोन दिवस दर स्थिर होते. त्यानंतर पुन्हा 22, 23 जानेवारी या दोन दिवसांमध्ये पेट्रोल पुन्हा 48 पैसे आणि 53 पैशाने डिझेल वाढले. त्यानंतर दर स्थिर झाल्यानंतर, 26 जानेवारी पासून पुन्हा आता दरवाढ सुरू झाली. मात्र, त्यानंतर इंधनाचे दर पुन्हा स्थिर झाले मात्र घट झाली नसून पुन्हा गेल्या दोन दिवसांपासून इंधन दराने उच्चांक गाठला आहे.
देशातील महानगरातील इंधनाचे दर
मुंबईतील पेट्रोलचा दर 93.49 रूपये आहे. त्याप्रमाणे चेन्नई 94.80, दिल्ली 86.95, कोलकात्ता 88.30, बंगळुरू 95, चंदीगड 83.68 रूपये तर झिझेलच्या दरांमध्ये मुंबई 83.99 रूपये, त्याप्रमाणे चेन्नई 82.80, दिल्ली 77.13, कोलकाता 80.71, बंगळुरू 82.60, चंदीगड 76.85 रूपये दर होते.
महत्त्वाची बातमी : सोनू सूद बॅकफूटवर ! असं काय घडलं की आता सोनू सूद हॉटेलसाठी घेणार अधिकृत परवानगी
राज्यात नांदेडमध्ये पेट्रोल,डिझेल सर्वाधिक महाग
मुंबईसह राज्यभरात इंधन दरवाढीला सर्वसामान्य नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये सर्वाधिक नांदेड जिल्ह्यात 95.58 रुपये तर डिझेल 84.75 रुपये त्याखालोखाल परभणी मध्ये पेट्रोल 95.31 रुपये तर डिझेल 84.47 तर रत्नागिरी पेट्रोल 95.4 रुपये तर डिझेल 84.21 रुपयांचे दर असून, राज्यभरात सर्वाधिक फटका या जिल्ह्यांना बसला आहे.
mumbai news after two days of halt petrol and diesel rates increased in mumbai
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.