Mumbai News : मुंबईकरांनो मच्छरांपासून सावधान ; मलेरिया डेंग्यूच्या रुग्ण संख्येत होत आहे वाढ !

dengue
denguesakal media
Updated on

Mumbai News : मुंबईसह परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. यामुळे परिसरामध्ये आजारही चांगलेच बळावले आहेत. यामुळे मुंबईकरांनी स्वतःची काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे.

गेल्या आठवड्याभरात डेंग्यूच्या (Dengue) रुग्णांची संख्या दुप्पट असून मलेरिया रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आठवडाभरात मलेरियाचे 721 , डेंग्यूचे 569 आणि गॅस्ट्रोचे 1 हजार हुन अधिक रुग्ण आढळले आहेत.

dengue
Nana Patole : नाना पटोलेंचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात ? प्रदेशाध्यक्षपद मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्राला जाण्याची शक्यता

अधिक माहिती अशी कि, रुग्णांची संख्या वाढल्याने महानगरपालिकने आपली यंत्रणा तयार केली आहे. मुंबईकरांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

dengue
Sakal Podcast : शरद पवारांच्या उपस्थितीत मोदींना पुरस्कार ते समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात

प्रतिबंधात्मक उपाययोजना

दर आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवसा पाळावा.

घरातील कुलरमधील , फुलदाण्यातील आणी मनीप्लॅटमधील पाणी आठवड्यातून बदलावे.

घरातील सांडपाण्यात अबेटमध्ये औषध टाकून घ्यावे.

घरात/परिसरात पाणी साचू देऊ नये, वाहते करावे.

dengue
Nitin Desai Death : का केली असेल आत्महत्या?

डास प्रतिबंधात्मक मलम, उदबत्त्या, वडया यांचा वापर करावा.

संपूर्ण अंग झाकलं जाईल असे कपडे घालावे.

मच्छरदाणीचा वापर करावा.

महानगरपालिकेतर्फे धूर फवारणी करणाऱ्या पथकाला सहकार्य करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.