Mumbai News : आता कस वाटत गार गार वाटत; भाजप प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

जानेवारीत अयोध्या येथे राम भक्तांना घेऊन जाण्याचे आश्वासन
chandrshekar bawnkule
chandrshekar bawnkule sakal
Updated on

डोंबिवली - भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली होती त्यावेळी त्यांनी म्हटले होते की आमचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामांचे अयोध्या येथे मंदिर झाले पाहिजे. त्यावेळी काँग्रेस वाले तसेच उद्धव ठाकरे हे भाजप वाल्यांना म्हणायचे "मंदिर वही बनायेंगे लेकीन तारीख नही बताऐंगे" आता किती तारीख आली. आता कस वाटत काँग्रेस सरकारला उद्धव ठाकरे यांना... गार गार वाटते ना...असे बावनकुळे यांनी म्हणत विरोधकांना टोला लगावला.

आगामी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे सरकार केंद्रात आणण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहे. याअंतर्गत प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा 2024 संकल्प दौरा आयोजित करण्यात आला होता. त्याच बरोबर देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतकाळामध्ये "मेरी माटी मेरा देश" हे अभियान देशभरात मोठ्या उत्साहात साजरं करण्यात येत आहे. रविवारी बावनकुळे डोंबिवली मध्ये होते.

अप्पा दातार चौक येथे आयोजित संवाद कार्यक्रमात बावनकुळे यांनी संवाद साधताना विरोधकांना वरील टोला हाणला. यावेळी केंद्रीय मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, संजय केळकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

chandrshekar bawnkule
Mumbai Local Crime: धक्कादायक: धावत्या लोकलमध्ये झाला महिलेचा विनयभंग!

प्रदेश अध्यक्ष बावनकुळे म्हणाले, आपण सर्वजण

527 वर्षे वाट पहात आहोत. किती पिढ्या यात गेल्या. विरोधकांनी आपल्याला सुनावले पण आता तारीख त्यांना पण समजली असेल असे बावनकुळे म्हणाले. यानंतर त्यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांना जवळ बोलवत लोकनेते असा त्यांचा उल्लेख केला. तसेच येत्या जानेवारी महिन्यात अयोध्येत आपल्याला येथील लोकांना घेऊन जायचे आहे. माझी विनंती आहे असं समजा असे सांगताच मंत्री चव्हाण यांनी मतदारसंघात 3 लाख मतदार आहेत. दिड लाख तरी नक्किच घेऊन जाऊ असे चव्हाण म्हणताच यांना खटारा बस नको एअर कंडिशनर बसने घेऊन जा असे बावनकुळे म्हणाले.

chandrshekar bawnkule
Mumbai : अजित पवार दिवाळीनंतर राज्याचा दौरा करणार

दरम्यान बावनकुळे यांनी कल्याण डोंबिवली मध्ये भाजप पदाधिकारी यांच्यासोबत शहरातील व्यापारी, व्यावसायिक यांची भेट घेतली. भाजपच्या वतीने यावेळी शक्तिप्रदर्शन देखील करण्यात आले.

यादरम्यान एका मराठा क्रांती मोर्चाच्या व्यक्तीने एक मराठा लाख मराठा अशी घोषणा बाजी केली. यावरून बावनकुळे यांनी देखील मंचावरून एक मराठा लाख मराठा अशी घोषणा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच यावर योग्य तो निर्णय देतील. सर्व पक्ष हे मराठा समाजाच्या बाजूने असून शिंदे यांच्या भूमिकेशी आम्ही सर्व सहमत असू असे सांगितले. तसेच त्या मराठा आंदोलकास मंचावर बोलावून देखील घेतले.

डोंबिवली दौऱ्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेस भेट दिली. डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.