Chitra Wagh-Supriya Sule
Chitra Wagh-Supriya Sule

Chitra Wagh-Supriya Sule : बलात्कार की तरुणीशी शारीरिक लगट? पण राजकारण तापलं

Published on

मुंबईत हार्बर रेल्वेने जाणाऱ्या एका २० वर्षीय मुलीशी शारिरीक लगट करण्याचा प्रयत्न केला गेला. सकाळी ७.२७ मिनीटाच्या लोकलमध्ये हा सगळा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपी नवाजू करीम शेखला पोलीसांनी ४ तासांच्या आत अटक केली.

या गंभीर प्रकरणी आता राजकारण पेटलयं. हा बलात्कार होता की, शारीरिक लगट यावरून राष्ट्रावादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात वाद सुरु आहे. आता मुंबई लोकलमध्ये १४ जूनला सीएसएमटी रेल्वे स्थानक येथून सकाळी ०७.२६ वा. २० वर्षीय तरूणीने पनवेल ट्रेन पकडली. ही तरुणी हार्बर रेल्वेने बेलापूर येथे परीक्षेसाठी चालली होती.

महिला राखीव डब्यामध्ये तरूणी आणि एक वृद्ध महिला होती. ट्रेन वेग पकडतचं असतानाचं नवाझ करीम महिलांच्या डब्यात चढला. या डब्यात वृद्ध महिलेशिवाय आणि तरूणीशिवाय कोणीचं नव्हतं या संधीचा नवाझने फायदा घेतला. नवाझने तरुणीशी शारिरीक लगट करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने आरडा-ओरडा करायला सुरुवात केली.

तरुणीसोबत डब्यात असलेल्या वृद्ध महिलेने पोलिसांच्या नावाने मदतीसाठी आरडाओरडा सुरुवात केली. पण सकाळची वेळ असल्याने पोलीस कर्मचार्यांची ड्यूटी सकाळी ६ वाजताचं संपली होती. त्यामुळे कोणाचीही मदत मिळाली नाही. अशात मशीदबंदर रेल्वेस्थानक आल्यानंतर आरोपीने रेल्वेतून खाली उडी मारली.

घाबरलेली तरूणीसुद्धा शेजारच्या जनरल डब्यात चढली. यात पुरुष प्रवास करत होते. तरूणीची अवस्था बघून प्रवाशांनी तिला विचारपुस करायला सुरुवात केली. तेव्हा तरूणीने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर सहप्रवाशांनी १५१२ रेल्वे पोलीस हेल्पलाईनवर संपर्क करुन माहिती दिली. पोलीसांच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे ०४ स्वतंत्र तपास पथके तयार करुन आरोपी नवाजू करीम शेखला ०४ तासात अटक करण्यात आली

४० वर्षाीय नवाजू मूळचा बिहारचा असल्याचे समजतयं. पण या अत्यंत संवेदनशील अशा प्रकरणावर मात्र राजकीय मंडळी भांडताना पहायला मिळत आहे. याप्रकरणी सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत माहिती दिली.

संतापजनक!

चालू लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एका व्यक्तीने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. ही अतिशय संतापजनक घटना आहे. यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे. या घृणास्पद घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी तपासयंत्रणांनी कार्यवाही करणे गरजेचे आहे.

सुप्रिया सुळे यांच्या या ट्विटवर चित्रा वाघ यांनी प्रतिउत्तर दिलं

अहो महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई, काविळ झालेल्यांना जग जसं पिवळं दिसतं तसं तुमचं झालंय. सत्तेचा स्ट्राईक रेट कमी झाल्याचा हा परिणाम आहे हे आम्ही समजू शकतो, पण लोकलमध्ये महिलेवर बलात्कार झाल्याचं एवढं मोठ्ठं स्टेटमेंट करण्याआधी मोठ्ठ्या ताईंनी थोडी शहानिशा तरी करायला हवी होती…

तुम्ही मुलीवर लोकल रेल्वेत बलात्कार झाल्याचं ट्विट केलंय पण तसं काहीच घडलं नाही. नाहक मुलीची बदनामी करू नका..

त्या आरोपीनं मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला… पोलिसांनी लगेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केला… ही वस्तुस्थिती. आपण आयुक्त यांच्याकडूनही माहिती घेऊ शकला असता पण ते न करता बलात्कार झाला म्हणत ट्वीट केलत..

तुमच्या या वक्तव्यामुळे खोट्या बातम्यांचा आणि अफवांचा सुकाळ होण्यास हातभार लागणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की अफवा पसरवू नका आणि माझी संपूर्ण जनतेला विनंती आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका !

अत्याचार करण्याचा प्रयत्न असेल किंवा अत्याचार हे दोन्ही गंभीर आहे. महिला सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाहीच लोकलमध्ये महिलांना सुरक्षित वातावरण देणं ही रेल्वे पोलिसांची जबाबदारी आहे, त्यापासून पळ काढता येणार नाही. या निमित्तानं रेल्वे हेल्पलाईन आणि लोकल मधील महिलांबाबतचे गुन्हे याचं ॲाडीट करणं गरजेचं आहे व ते येणाऱ्या दिवसात नक्कीच होईल

आता या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.

पण या दरम्यान प्रश्न असा उपस्थित होतो की, इतक्या संवेदनशील घटनेवर वाद घालणं किंवा राजकारण करणं कितपत योग्य आहे. कारण पिडीतेवर बलात्कार झालाय की शारीरिक लगट यापेक्षा तिच्यावर अन्याय झालाय हे महत्वाचं...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.