Mumbai News : ...तर जून अखेरनंतर पाणी कपात; सध्या तलावात १६ टक्के पाणीसाठा

 water
water
Updated on

मुंबई - मुंबईला पाणी पुरवठा करणा-या तलावांनीही तळ गाठला असून सात तलावांत ‘राखीव कोट्या’सह सद्या १६ टक्के इतका पाणीसाठी शिल्लक आहे. हा पाणी साठा ४८ दिवस पुरेस इतका आहे. पाऊस लांबला तर पाण्याचा आढावा घेऊन जूनअखेरपासून १० ते १५ टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

 water
Chitra Wagh-Supriya Sule : बलात्कार की तरुणीशी शारीरिक लगट? पण राजकारण तापलं

मुंबईसह बाजूच्या परिसरात मान्सूनचे आगमन होईल याची प्रतीक्षा होती. मात्र अर्धा जून उलटला तरी मुंबईत पावसाचा पत्ता नाही. पालिकेच्या व राज्य सरकारच्या राखीव कोट्यातून मिळून अवघे १६ टक्केच म्हणजे पुढील ४८ दिवस पुरेल इतके पाणी शिल्लक आहे. त्यामुळे मान्सून लांबल्यास मुंबईत पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

तानसा, मोडकसागर, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईतीला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. सद्या सातही धरणांत १६ टक्के म्हणजे २ लाख ५० हजार ६९१ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.

जून अखेरनंतर पाण्याचा आढावा घेऊन मुंबईकरांचे पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला घेतला जाणार आहे. गेल्या वर्षी संपूर्ण जूनमध्ये पावसाने दडी मारल्याने एकूण पाणीसाठा ११ टक्क्यांपर्यंत खाली गेल्याने २७ जूनपासून १० टक्के पाणीकपात करण्यात आली होती.

मात्र जुलैच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस झाल्याने तलावांत २५ टक्के पाणी जमा झाले त्यामुळे १२ दिवसांतच पाणीकपात मागे घेण्यात आली होती. यंदाही लांबलेला पाऊस आणि वेगाने कमी झालेला पाणीसाठा त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे.

 water
MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर, इथे पाहा डिटेल्स

पाणीसाठा

२०२३ - १२८८७३ दशलक्ष लिटर (८.९०टक्के)

२०२२ - १७७१३० दशलक्ष लिटर (१२.२४ टक्के)

२०२१ - १८४४९६ दशलक्ष लिटर (१२.७५ टक्के)

राखीव कोट्याचा दिलासा

- सात तलावांत सद्यस्थितीत १२८८७३ दशलक्ष लिटर म्हणजेच केवळ ८.९० टक्के पाणी उपलब्ध आहे. हा साठा अगदी कमी होता. मात्र राज्य सरकारच्या अखत्यारीतील भातसा आणि अप्पर वैतरणाचा राखीव कोटा वापरण्याची परवानगी मिळाल्यामुळे एकूण जलसाठा १६ टक्क्यांपर्यंत राहिला आहे. या दोन तलावांमधून दररोज १५० दशलक्ष लिटर पाणी मिळत आहे. त्यामुळे राखीव कोट्यामुळे मोठा दिलासा मिळाला.

निवडणुकीमुळे पाणी दरवाढ नाही

वाढती महागाई, देखभाल-दुरुस्ती खर्च यामुळे पाणीपट्टीमध्ये वाढ केली जाते. यानुसार यावर्षीदेखील प्रशासनाकडून दरवाढी प्रस्तावित होती. मात्र दरवाढीला नागरिकांसह सर्वच राजकीय पक्षांकडून विरोध होत असल्यामुळे यंदा ही दरवाढ टळणार असल्याचे संकेत पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहे. मुंबईला पालिकेकडून केल्या जाणार्‍या पुरवठ्यामध्ये एक हजार लिटरसाठी सुमारे २८ रुपयांचा खर्च येतो. मात्र या पाणी पुरवठ्यासाठी घरगुती, व्यावसायिक वापरांनुसार शुल्क आकारले जाते. यामध्ये ५ रुपयांपासून ९५ रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.