Mumbai News : मुंबईतील प्रदुषणाचा वाद चिघळला; आदित्य विरूध्द शेलार यांच्यात जुपली

आदित्य ठाकरे यांनी थेट पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहक यांना प्रदुषणाला जबाबदार धरले
mumbai
mumbaisakal
Updated on

मुंबई - मुंबईत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे प्रदुषण वाढत आहेत. प्रदुषण रोखण्यासाठी पालिकेने कठोर पावले उचलली आहेत. याप्रकरणी आता भाजपा आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात जोरदार जुंपली आहे. तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीच मुंबईत सुरू असलेल्या बांधकामांना परवानगी दिली आहे. त्यामुळे वाढत्या प्रदुषणाला ठाकरे हेच जबाबदार आहेत, अशी टीका भाजपाने केली आहे. त्यावरून मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.

आदित्य ठाकरे यांनी थेट पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहक यांना प्रदुषणाला जबाबदार धरले आहे. त्यांनी म्हटले आहे, प्रशासकांनी सांगावे की, या महाघोटाळ्यातील रस्त्यांची कामे कधी सुरु होणार? आयुक्तांनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर मौन सोडून त्यावर काय केले, हेही सांगायला हवे. मुंबईत बिल्डर आणि कंत्राटदारांसाठी काही नियमावली काढली आहे.

पण अशी नियमावली मार्चमध्ये आणि त्याआधीदेखील काढली होती. या नियमांची अमलबजावणी का नाही झाली? त्याचे उल्लंघन कोणी केले? पालिकेच्या या नियमांचे उल्लंघन करुन वायूप्रदूषण करणाऱ्यांवर काय कारवाई केली? अशा चुकार कंत्राटदारांवर, विल्डरांवर काय कारवाई केली. पालिका आयुक्तांनी या प्रश्नाचे उत्तर द्यायला हवे असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. आयुक्तांवरील टीका भाजपाला चांगलीच झोंबली आहे. या टीकेला शेलार आदित्य यांच्यात जोरदार ट्विटर वॉर सुरू झाले आहे.

mumbai
Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी केलेले आरोप निराधार; BMCचे स्पष्टीकरण !

मुंबई भाजपाचे अध्यक्ष शेलार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे की, गेल्या २०२१ या वर्षांत मुंबईत प्रदूषणामुळे ९ हजार १०० नागरिकांचा मृत्यू झाला. यावेळी हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दूषित हवेतील सल्फर डायऑक्साईडमुळे ज्वालामुखी, आम्लवर्षा, हृदरोग, श्वसनाचे विकार, कर्करोग, डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी यासारखे आजार वाढले. नायट्रोजन डाय ऑक्साइडमुळे फुफ्फुसाचा दाह, जंतूसंसर्ग, कार्बन मोनॉक्साइडमुळे हृदयरोग, मेंदूला हानी होण्याचा धोका निर्माण झालाय.

mumbai
Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचे मुंबई महानगरपालिकेवर आरोप ; म्हणले पालिका... !

या प्रदूषणामुळे ओझोनची पातळी वाढत असून, वाढणारा ओझोन शरीराला घातक ठरू शकतो असे डॉक्टर सांगतात. कोविडमध्ये बिल्डरांना ठाकरे गटाने प्रिमियमची सवलत दिली. त्यानंतर मुंबईत ३ हजार ५०० बांधकामे सुरु झाली. यावर्षी हाच आकडा आता ६ हजारापर्यंत पोहचला. म्हणजे केवळ वर्षभरात २ हजार ५०० बांधकाम साईट वाढल्या. आपल्या कटकमिशनसाठी, राजकीय हट्टापायी. ठाकरे गटाने मुंबईची "प्रदूषण नगरी" अशी ओळख करुन दाखवली! अशा शब्दात टीका करीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना शेलार यांनी घेरले आहे.

mumbai
Ashish Shelar : भाजप वाघनख आणत असल्याने पेंग्विन कुटुंबाच्या पोटात दुखतं; शेलारांचा ठाकरेंना टोला

आदित्य ठाकरेंना आव्हान

मिठी नदीच्या नदीचे प्रदुषणाला जबाबदार ठाकरे यांना धरले आहे. नदीच्या प्रदूषण नियंत्रणासाठी सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात पॅकेज 2 व पॅकेज 3 यामधील विविध कामांसाठी आणखी 654 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. किती गाळ काढला, कुठे टाकला, कुणी खाल्ला, प्रदुषण किती कमी झाले असे अनेक प्रश्न शेलार यांनी उपस्थित केले आहेत. युवराज आदित्य ठाकरे यांनी उत्तर द्या! असे आव्हान आशिष शेलार यांनी दिले आहे. त्यामुळे प्रदुषणाचा विषय चागलाच गाजला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()