Mumbai News: बकऱ्याची बिल्डिंग मध्ये एंट्री मग सुरू झाला राडा! ठाण्यात थेट दंगल नियंत्रण पथकाला बोलवलं अन्

मिरा रोड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे
Mumbai News
Mumbai NewsEsakal
Updated on


मिरा रोड परिसरातील एका घटनेनं खळबळ उडाली आहे. मिरा रोड पूर्वेच्या जेपी इन्फ्रा कॉम्प्लेक्समध्ये एका बकऱ्यावरून मोठा गोंधळ झाला आहे. एका व्यक्तीला सोसायटीमध्ये बकरा घेऊन येण्यासाठी सुरक्षा रक्षकाने विरोध केला होता. त्यानंतर सोसायटीमधील सर्व रहिवाशांनी खाली उतरत बकरा आणण्यासाठी एकत्रित विरोध केला. यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. संपुर्ण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केलं.(Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मिरा रोड पूर्वेच्या जेपी इन्फ्रा कॉम्प्लेक्समध्ये मोहसीन शेख नावाची व्यक्ती सोसायटीमध्ये एक बकरा घेऊन आली होती. मोहसीन शेख यांना सोसायटीमध्ये बकरा घेऊन येऊ नका म्हणत सुरक्षा रक्षकाने विरोध दर्शवला होता. त्यानंतर सोसायटीमधील नागरिकांनी देखील बकरा आणण्यासाठी विरोध केला आहे.(Latest Marathi News)

Mumbai News
Sambhaji nagar : केबिन उडाली तरी खुमखुमी... ट्रक चालकाचा धक्कादायक प्रवास, RTO पोलिसांचे दुर्लक्ष

या संपुर्ण प्रकरणामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. रहिवाशी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्या ठिकाणी हनुमान चालीसाचं पठण देखील सुरू केलं. तणाव आणखी वाढु नये यासाठी पोलीसांनी मध्यस्थी करत शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे.(Latest Marathi News)

Mumbai News
वरिष्ठ IRS अधिकारी सचिन सावंत यांना अटक; 500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी कारवाई

घटनेची माहिती मिळताच काशिमिरा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांकडून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक आपल्या मागणीवर ठाम असल्यामुळे वाद आणखी चिघळला. खबरदारी म्हणून पोलिसांकडून दंगल नियंत्रण पथकाला देखील पाचारण करण्यात आलं.(Latest Marathi News)

परिसरातील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. स्थानिकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर देखील या प्रकरणात अद्याप तोडगा निघालेला नाही. नागरिक आपल्या मागणीवर ठाम आहेत.(Latest Marathi News)

Mumbai News
Pakistan Army : PoK मधील गरीबांना भारतात घुसखोरीसाठी दिले जातायत पैसे; काम होताच पाकिस्तान आर्मी घालते गोळ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.