Mumbai News : ११ वर्षीय मुलाने २२ किमी अंतर अवघ्या ६ तासात केले पोहत पार !

Mumbai News : ११ वर्षीय मुलाने २२ किमी अंतर अवघ्या ६ तासात केले पोहत पार !
Updated on


Mumbai News : डोंबिवली येथील ११ वर्षीय जलतरणपटू निर्भय भारती याने अरबी समुद्रातील २२ किमीचे अंतर अवघ्या ६ तासांत पोहून पार केले आहे. यश जिमखानामध्ये निर्भय हा पोहण्याचे प्रशिक्षण घेत असून त्याच्या या कामगिरीमुळे सारेच त्याचे कौतुक करत आहेत.
ठाकुर्ली परिसरात निर्भय हा राहत असून डोंबिवलीतील ओमकार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता सहावीमध्ये तो शिक्षण घेत आहे.

पोहण्याची लहानपणापासून आवड असल्याने त्याच्या पालकांनी यश जिमखाना येथे पोहण्याचे प्रशिक्षण सुरू केले. जलतरणच्या विविध स्पर्धांत त्याला भाग घ्यायचा असल्याने त्याने मेहनत घेण्यास सुरुवात केली. समुद्रात सराव करण्यासाठी तो महिन्यातील २ दिवस उरण येथे संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धडे गिरवत होता. समुद्राची सफर त्याला आवडू लागल्याने त्याने समुद्रातील इव्हेंट करायचा निर्धार केला.

Mumbai News : ११ वर्षीय मुलाने २२ किमी अंतर अवघ्या ६ तासात केले पोहत पार !
Mumbai Breaking: तब्बल १० दिवस या मार्गावर मेगाब्लॉक ; २५० लोकल रद्द

प्रशिक्षक विलास माने यांच्याशी बोलून यश जिमखानामध्ये एक महिना ४ ते ५ तास दररोज रात्री सराव करत होता. सराव पूर्ण केल्यावर ५ ऑक्टोबरला पहाटे ५ वाजता करंजा जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया हे २२ किमी अंतर पार करण्यास सुरुवात केली.

त्याने हे अंतर ६ तास ३४ सेकंदात पूर्ण केले. कैलाश आखाडे यांच्या मार्गदर्शनात त्याने हे अंतर पार केले. दरम्यान, बदलते हवामान, परतीचा पाऊस, ऊन यासह गेट वे ऑफ इंडियाजवळ समुद्रात पाण्यावर आलेला तेलाचा तवंग पसरल्यामुळे पोहताना त्रास होत होता; मात्र मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर निर्भयने हे अंतर पार केले आहे. जलतरण प्रशिक्षक विलास माने, रवी नवले, संतोष यांसह नातेवाईकांनी त्याच्या यशाचे कौतुक केले आहे.

Mumbai News : ११ वर्षीय मुलाने २२ किमी अंतर अवघ्या ६ तासात केले पोहत पार !
Mumbai News : बदलापूर पाईपलाईन रोड अंधारात; एमआयडीसी प्रशासनाचे लक्षच नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.