Mumbai News
Mumbai Newssakal

Mumbai News: मराठी माणसाला नडले ; जागा नाकारणाऱ्या पिता पुत्राला अटक

Published on

Mumbai News: मुलुंड परिसरात कार्यालयासाठी जागा शोधण्यास गेलेल्या एका मराठी महिलेला जागा देण्यास नकार दिल्याचा प्रकार बुधवारी (ता. २७) समोर आला.

गुरुवारी मध्यरात्री मुलुंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर मुलुंड पोलिसांनी जागा नाकारणाऱ्या पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. प्रवीण ठक्कर आणि त्यांचा मुलगा नीलेश ठक्कर अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दरम्यान, मुलुंडमधील या प्रकाराबद्दल सर्वसामान्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

मुलुंड पश्चिमेकडील शिवसदन सोसायटीमध्ये बुधवारी सकाळी पीडित महिला तृप्ती देवरूखकर पतीसोबत कार्यालयाकरिता जागा शोधण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी सोसायटीचे सचिव प्रवीण ठक्कर आणि नीलेश यांनी ‘मराठी माणसांना जागा देत नाही’, असे सांगत जागा दाखवण्यास नकार दिला.

यावेळी महिलेने संपूर्ण घटनेचे मोबाईलमध्ये चित्रण केले; ठक्कर पिता-पुत्राने महिलेकडून मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण महिलेने समाज माध्यमावर प्रसारित केले.

तृप्ती देवरूखकर यांनी गुरुवारी रात्री याप्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. दरम्यान, मनसेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकाराची दखल घेत ठक्कर यांना धारेवर धरत महिलेची माफी मागण्यास भाग पाडले.

Mumbai News
Mumbai News : एसटी बँक वाचविण्यासाठी आम्ही गांधीजी होण्यास तयार; सदावर्तेंच्या संचालक मंडळाच्या विरोधात संघटना आक्रमक

मी मुंबईत घर शोधायला गेले, तेव्हा मराठी म्हणून मला घर नाकारण्यात आले होते. मराठी लोकांना आमच्या भागात घर देत नाही, हे शब्द मीदेखील अनुभवले आहेत. भाषावाद, प्रांत या विषयावर मी कधी भाष्य करत नाही; परंतु सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहून मन खिन्न होते.

- पंकजा मुंडे, माजी आमदार, भाजप

Mumbai News
Mumbai : अतिरेकी नथुराम गोडसेचे उदात्तिकरण करणाऱ्या सदावर्तेला बेड्या ठोका - अतुल लोंढे

भाजपची चिडीचूप, विरोधकांकडून निषेध

मुलुंडमधील प्रकाराचा सर्वच स्तरांतून निषेध व्यक्त होत आहे. भाजपने मात्र या वादापासून दोन हात लांब राहण्याची भूमिका घेतली आहे. झालेल्या प्रकाराबद्दल राज्यातील भाजपच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याने निषेध व विरोध दर्शवला नाही. भाजप वगळता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आदींनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला. राज्य मानवी हक्क आयोगानेही याची दखल घेतली आहे; तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.

Mumbai News
Mumbai Diaries 2 : २६ नोव्हेंबर रोजी नेमकं काय घडलं होतं? 'मुंबई डायरीज'चा थरकाप उडवून देणारा ट्रेलर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.