Mumbai News : पाकिस्तानी सीमाला परत द्या, अन्यथा मुंबईत घातपात; पोलिसांना अज्ञाताकडून धमकीचा कॉल

seema haider
seema haider
Updated on

मुंबई : मुंबई पोलिसांना बुधवारी 26/11 सारखा दहशतवादी हल्ला होण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून सीमा हैदरला पाकिस्तानला परत न पाठवल्यास मुंबईत 26/11 सारखा हल्ला पुन्हा होईल अशी धमकी दिली. हा फसवा कॉल असावा असा पोलिसांना संशय आहे, परंतु धमकीचा संदेश पाठवणाऱ्याचा तपास पोलीस करत आहेत.

seema haider
Devendra Fadnavis : भाजपचा मिशन १५२चा नारा! फडणवीसांचे विधान शिंदे-अजित पवारांचं टेन्शन वाढवणारे

संपूर्ण प्रकरण....

पाकिस्तानी महिला सीमा हैदरचे नोएडा येथे राहणाऱ्या सचिनसोबत ऑनलाइन गेमच्या माध्यमातून मैत्री झाली. त्यानंंतर त्याचे रूपांतरण प्रेमसंबंधात झाले. दोघेही 3 वर्षे एकमेकांशी संपर्कात होते. सीमा नेपाळमार्गे 4 मुलांसह नोएडा येथे आली. दोघेही दीड महिन्यांहून अधिक काळ पती-पत्नीसारखे राहत होते. मात्र, ही माहिती वकिलामार्फत पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलिस तेथे पोहोचले तेव्हा तेथे फक्त सचिन आढळून आला. तर महिला मुलांसह तेथून निघून गेली होती. यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले.

seema haider
Devendra Fadnavis : ''जेव्हा जेव्हा बेईमानी होईल तेव्हा तेव्हा कूटनीतीचा वापर करावाच लागेल'' फडणवीसांकडून महाभारताचे दाखले

सीमाचा दावा

इकडे सीमाने दावा केला की ती ऑनलाईन पब्जी गेमद्वारे नोएडामध्ये राहणाऱ्या सचिनच्या संपर्कात आली होती. दोघेही प्रेमात पडले. यानंतर सीमा चार मुलांसह नेपाळला पोहोचली. तिथून ती बसने भारतात आली आणि नोएडामध्ये सचिनसोबत लग्न केल्यानंतर 50 दिवस तिथेच राहिली. गुपित उघड झाल्यावर सीमा आणि सचिनला अटक झाली. सध्या दोघेही जामिनावर बाहेर आहेत.

यापूर्वीची धमकी

यापूर्वी 11 जुलै रोजी बलुचिस्तानमधील दहशतवादी संघटनेने एक व्हिडिओ जारी करून भारताला धमकी दिली होती. सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवण्याबाबत एक सशस्त्र दहशतवादी बोलत होता. सीमा आणि तिच्या चार मुलांना पाकिस्तानच्या ताब्यात न दिल्यास त्याचे परिणाम पाकिस्तानातील हिंदू आणि इतर गैर-मुस्लिमांना भोगावे लागतील, अशी धमकी या दहशतवाद्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.