Mumbai News : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! या दोन गाड्यांना कायमस्वरूपी डब्यांची वाढ !

Passenger Train
Passenger Train
Updated on

मुंबई : मध्य रेल्वेच्या दादर-मनमाड आणि दादर-धुळे विशेष एक्सप्रेसला एक शयनयान आणि तीन सामान्य द्वितीय श्रेणी कायमस्वरूपी डब्बे जोडण्याचा निर्णय घेतला आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Passenger Train
चक्क न्यायालयाच्या परिसरातच त्याने घातली 'तिला' लग्नाची मागणी; नात्याला मिळाली आणखी एक संधी

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, दादर-मनमाड आणि दादर-धुळे विशेष एक्सप्रेसला एक शयनयान आणि तीन सामान्य द्वितीय श्रेणी कायमस्वरूपी डब्बे

अनुक्रमे १८ मे २०२३ आणि २० मे २०२३ पासून वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहेत. आता ट्रेन क्रमांक ०२१०१/०२१०२ आणि ट्रेन क्रमांक ०१०६५/०१०६६ ला एक वातानुकूलित चेअर कार, १ शयनयान , ८ द्वितीय आसन श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन सह ५ सामान्य द्वितीय श्रेणी अशी सुधारित संरचना असणार आहे.

Passenger Train
Shahajibapu Patil: पुन्हा सांगोल्यात लाल दिव्याची चर्चा! आमदार शहाजी पाटलांना मिळणार मंत्रीपद?

नव्याने जोडण्यात येणाऱ्या एक शयनयान आणि तीन सामान्य द्वितीय श्रेणी डब्यामधील आसनाचे आरक्षण १७ मे २०२३ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी संकेतस्थळावर सुरू होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.