Mumbai News : मुंबईत अवैध बॅनरची डोकेदुखी; महापालिका प्रशासन खडबडून जागे

BMC : न्यायालयाच्या निर्देशानंतर कारवाई सुरू
bmc
bmcsakal
Updated on

मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांना अवैध बॅनर आणि पोस्टर्सवर प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही मुंबईत ठिकठिकाणी लटकलेले बॅनर्समुळे महापालिका प्रशासन टीकेचे लक्ष बनले आहे.

bmc
Nagpur Crime : क्षुल्लक कारण व चारित्र्यावर संशय ठरतोय घातक

गणेशोत्सवादरम्यान लावण्यात आलेल्या पोस्टर्स आणि बॅनर्सवर आठवडाभरानंतर महापालिकेने कारवाई सुरू केली. त्यानंतर नवरात्र आणि दसऱ्याच्या दिवशी मुंबईत ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले. दसऱ्याला १० दिवस उलटले तरी बॅनर, पोस्टर हटवण्याबाबत महापालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसली नाही.

राजकीय दबावापोटी महापालिकेचे अधिकारी बेकायदा लावलेल्या बॅनर, पोस्टर्सवर कारवाई करत नाहीत. मुंबईतील काही प्रमुख रस्त्यांवर लावलेले अवैध बॅनर एकदोन दिवसांनी हटवले जातात; मात्र अंतर्गत भागात लावण्यात आलेल्या बॅनरकडे महापालिका फारसे लक्ष देत नाही.

रात्री बॅनर लावणे बंद करण्याचे पोलिसांना पत्र
महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून रात्री बेकायदा बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या पत्रात म्हटले आहे, की मुंबई पोलिस रात्रीच्या वेळी गस्त घालत असतात. त्यामुळे रात्री लावलेल्या बॅनर, पोस्टर्सवर कारवाई होऊ शकते. दोषींना अटक करून त्यांच्यावर एफआयआर नोंदवावा, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.

bmc
Mumbai Crime : तीन लाखांचे एमडी जप्त!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.