मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये व्यवसायाच्या वाढत्या संधी, शहरांमध्ये सुरु असलेली विकासकामे आणि वाहतूक व दळणवळणाच्या सुविधांचा होत असलेला विकास यांमुळे मुंबईतील निवासी जागांच्या मागणीतील वाढ होते आहे. मुंबईतील निवासी मालमत्ताच्या किमतींमध्ये गेल्या दोन वर्षांत (2021-2023) १.७ टक्के संयुक्त दराने वाढ होत आहे. एकूण वाढ १४.४ टक्के आहे, असे मॅजिकब्रिक्सच्या प्रॉपइंडेक्स रिपोर्ट एप्रिल-जून २०२३मध्ये दिसून आले आहे.
मुंबईत निवासी जागांची मागणी एप्रिल ते जून २०२३ या तिमाहीच्या तुलनेत २.८ टक्के वाढली आहे. जानेवारी ते मार्च २०२३ या तिमाहीत मागणीमध्ये त्यापूर्वीच्या तिमाहीच्या तुलनेत २.४ टक्के घट झाली होती. निवासी जागांच्या पुरवठ्यात मागील तिमाहीच्या तुलनेत ४.३ टक्के घट झाल्यामुळे मालमत्तेचे सरासरी दर मागील तिमाहीच्या तुलनेत २.१ टक्क्यांनी वाढले आहे.
तर मुंबईत मध्यम श्रेणीतील मालमत्तांची मागणी (INR 15,000- 25,000) वाढून ४९ टक्क्यांपर्यंत गेली आहे. छोट्या रचनांच्या घरांना ग्राहकांचे प्राधान्य कायम आहे. त्यामुळे २ बीएचके घरांचा एकूण मागणीतील वाटा ४२ टक्के आहे, तर १ बीएचके घरांचा वाटा ३१टक्के आहे.
२०२३च्या दुसऱ्या तिमाहीत (Q2) नवी मुंबईतील मागणीमध्ये मागील तिमाहीच्या तुलनेत २.१ टक्के वाढ दिसून आली, तर पुरवठा मागील तिमाहीच्या तुलनेत ८.८ टक्क्यांनी घटला आहे. नवी मुंबईतील मालमत्तेचे सरासरी दर मागी तिमाहीच्या तुलनेत २.३ टक्क्यांनी वाढले आहेत. तर मागील तिमाहीत ठाण्यातील निवासी जागांची मागणी स्थिर होती. मागील तिमाहीच्या तुलनेत मागणीत ०.३% एवढी किंचित वाढ झाली, तर पुरवठ्यामध्ये मात्र मागील तिमाहीच्या तुलनेत ९.२ टक्क्यांनी घट झाली.
ठाण्यातील मालमत्तेचे सरासरी दर 2021च्या तिसऱ्या तिमाहीपासून १०.७ टक्क्यांनी वाढले आहेत. २०२१ची दुसरी तिमाही ते २०२१ची तिसरी तिमाही ह्या काळात ९.९ टक्क्यांची तीव्र घसरण झाल्यानंतर आता या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
"व्याजदरांमध्ये वाढ होऊनही, भारतातील निवासी जागांच्या मागणीत वाढ दिसून आली आहे. स्वत:च्या मालकीचे घर असण्याचे महत्त्व आणि त्यासोबत येणारी सुरक्षिततेची भावना याचा वाढत्या मागणीत मोठा वाटा आहे. अर्थात, अनेक व्यापक बाजारपेठांमधील निवासी जागांच्या किमती व ग्राहकांच्या बजेटची मर्यादा यातही लक्षणीय असमतोल आढळुन आला आहे. म्हणूनच ही वाढती मागणी, विशेषत: परवडण्याजोग्या घरांची व मध्यम श्रेणीतील घरांची मागणी, पूर्ण करण्यासाठी पुरवठा तातडीने वाढवण्याची आवश्यकता आहे.
- सुधीर पै, मुख्य कार्यकारी अधिकारी, मॅजिकब्रिक्स
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.