मुंबई : केंद्रिय मोटार वाहन कायद्यांतर्गत इलेक्ट्रिक बाईकला अद्याप परवानगी नाही. तरीसुद्धा मुंबईच्या रस्त्यांवर इलेक्ट्रिक बाईकचा सर्रास वापर केला जात आहे. ईलेक्ट्रिक बाईक कंपन्यांनी ठिकठिकाणी इलेक्ट्रिक बाईकचे अनधिकृत स्टॅंन्ड उभारले असून, नागरिकांकडून सर्रास अशा बाईकचा वापर केला जात आहे. त्यामूळे मुंबईतील वाहतुक कोंडीमध्ये भर पडतांना दिसून येत आहे.
प्रवासी वाहतूक इन कॅश करण्यासाठी अनेक ऍप बेस्ड कंपन्यांनी प्रवासी सेवा सुरू केली आहे. दुचाकी प्रवासी वाहतुक, इलेक्ट्रिक बाईक अशा सुविधा सध्या मुंबईमध्ये चर्चेचा विषय ठरल्या आहे. साधारण 25 किलोमीटरपर्यंत धावणाऱ्या ऍप बेस्ड ईलेक्ट्रिक बाईक सुद्धा काही कंपन्यांनी बाजारपेठेत आणल्या आहे. या बाईकला अद्याप परिवहन विभागाची मान्यता नसतानाही, नागरिकांच्या वापरात या बाईक देण्यात आल्या आहे.
मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहनांच्या वजनानुसार त्यांची वर्गमोड केली आहे. शिवाय वाहन प्रकारात मोडणारे वाहन चालविण्यासाठी मोटार वाहन कायद्यातील तरतूदी लागू करण्यात येते. त्यासाठी रोड टॅक्स, विमा, ड्रायव्हिंग लायसन्स, PUC अशा कागदपत्रांची सुद्धा गरज असते. मात्र, इलेक्ट्रिक बाईकला आरटीओमध्ये नोंदणी करण्याची सुद्धा गरज नसल्याने, अशा इलेक्ट्रिक बाईकला अद्याप वाहनाचा दर्जाच मिळाला नाही. त्यामूळे अशा इलेक्ट्रिक बाईकवर लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले आहे.
महत्त्वाची बातमी : लोकल प्रवाशांना होणार फायदाच फायदा; कारण आता लोकलमध्ये बसवणार MTRC सिस्टीम
कंपन्यांची रेल्वेकडे ई-बाईकसाठी जागेची मागणी
आधीच अनधिकृत सेवा असलेल्या ई बाईक कंपन्यांनी आता, रेल्वेच्या स्थानकांवरील जागा व्यापण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील काही निवडक रेल्वे स्थानकाबाहेर या कंपन्यांनी चार्जीक पॉंईंन्टसाठी जागा मागितले असून, त्याठिकाणी ई बाईक स्टॅंन्ड उभारले जाणार आहे. मात्र, चार्जिंग स्टेशनसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी काढण्यात आलेल्या कंत्राटातील करार करण्यापुर्वी सर्व नियमांचे काटेकोर पालन झाल्यानंतरच मान्यता दिली जाणार असल्याचे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले आहे.
mumbai news increasing numbers of e bikes on the road of mumbai creating traffic problem
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.