Mumbai News: मुंबईतल्या रेल्वे स्थानकावर इस्राइलचा झेंडा नागरिकांच्या पायाखाली ; वाचा काय आहे प्रकरण

effecf of israel hamas war on india
effecf of israel hamas war on india sakal
Updated on

Mumbai News: मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या एका रेल्वे स्थानावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे इस्राइलचा झेंडा हा चक्क एस्केलेटर म्हणजेच चालत्या जिन्याच्या अगदी जवळ लावण्यात आला आहे.

effecf of israel hamas war on india
Israeli Air Strike: इस्राइलच्या हवाई हल्ल्यात हमासच्या संस्थापकांपैकी एक ठार

इस्राइल आणि हमास यांच्यामध्ये सुरू असलेले युद्ध जास्तच रक्तरंजीत होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये कित्येक निष्पाप नागरीकांचा जीव जात असल्याचे दिसून येत आहे. या दोघांमध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये जगाची देखील वाटणी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

effecf of israel hamas war on india
Mumbra Shiv Mandir : पुरातन ‘मुंब्रेश्वर’ मंदिराची तुम्हाला माहिती आहे का ?

फक्त जागतिक स्तरावरच नाही तर स्थानिक पातळीवर या युद्धामुळे मतमतांतरे पाहायला मिळत आहेत. याचाच प्रत्यय मुंब्रा रेल्वे स्थानकावर येत असल्याचे पाहायला मिळत आहे.मुंब्रा रेल्वे स्थानकावर आपण उतरलो आणि मुंब्रा ईस्टकडे जायला निघालो की मुख्य जिना ज्यावर एस्केलेटर आहे, या ठिकाणी आपण पाहू शकतो की जिन्यावरून उतरताना अगदी नागरिकांच्या पायाखाली येईल असा इस्राइलचा झेंडा स्टिकरच्या माध्यमातून लावण्यात आले आहे. नागरिक नकळतपणे या झेंड्यावरून चालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.

संपूर्ण जगातील 'इस्लाम'ला मानणारे लोक हे या गाझापट्टीत राहणाऱ्या नागरिकांसाठी ठामपणे उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरून 'सेव गाझा' नावाचा कॅम्पेन चालवत आहेत.अश्यावेळी मुंब्रा स्थानकावर हा झेंडा लागल्याने चर्चांना उधाण आले आहे. मात्र हा झेंडा या ठिकाणी नक्की कोणी ठेवला आणि का म्हणून लावला असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. गुरुवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. सकाळचे प्रतिनिधी मुंब्रा येथे गेले असता ही बाब निदर्शनास आली.

झेंडा नक्की कोणी लावला?

या झेंड्याचे स्टिकर या ठिकाणी का बरं लावले असावे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. मात्र हा झेंडा नक्की कोणी लावला? आणि हा झेंडा का म्हणून लावला? हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. तरी देखील इस्राइलने गाजावर सुरू केलेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून हा झेंडा लावला असावा असा तर्क लावला जात आहे

effecf of israel hamas war on india
Mumbra: ड्रग्ज तस्करांच्या रडारवर पुन्हा ‘मुंब्रा’; सलमानच्या अटकेमुळे मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशय!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.