Mumbai News : आधीच गर्मी, त्यात अंधेरी-विलेपार्ले रेल्वे स्थानकांतील सरकते जिने बंद!

Mumbai News
Mumbai News
Updated on

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या अंधेरी आणि विलेपार्ले रेल्वे स्थानकांमधील सरकरते जिने वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सरकते जिने बंद असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशांना पुलाच्या पायऱ्या चढताना त्रास होतो. याबाबत बॉम्बे ईस्ट इंडियन असोसिएशन पश्चिम रेल्वेकडे तक्रार दाखल केली आहेत.

Mumbai News
Police Recruitment : मुंबई पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेनंतर 7076 उमेदवारांची निवड; आता पडताळणी...

रेल्वे प्रवाशांना सुविधेसाठी स्थानकात सरकते जिने आणि लिफ्ट बसविण्यावर भर पश्चिम रेल्वेकडून देण्यात देत आहे. परंतु, लिफ्ट आणि सरकते जिने संदर्भात योग्य देखभाल दुरुस्ती होत नसल्याने सरकरते जिने वारंवार बंद पडण्याचा तक्रारी रेल्वेकडे येत आहे. नुकताच पश्चिम रेल्वेच्या अंधेरी आणि विलेपार्ले स्थानकांमधील सरकरते जिने बंद असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशांना पुलाच्या पायऱ्या चढताना त्रास होतो.

याबाबत अनेक प्रवाशांनी समाजमाध्यमांवरून पश्चिम रेल्वेकडे तक्रारी केल्या. याशिवाय वॉचडॉग फाउंडेशन फाऊंडेशन आणि बॉम्बे ईस्ट इंडियन असोसिएशनने आता रेल्वेकडे तक्रार केली आहे. लवकरात लवकर रेल्वे अधिकाऱ्यांनी लक्ष घालून अंधेरी-विलेपार्ले रेल्वे स्थानकांतील बंद पडलेले सरकते जिने सुरु करण्याची विनंती केली आहे.

Mumbai News
Akola Riots : अकोला दंगलप्रकरणी मोठी अपडेट! मुख्य आरोपी अटकेत

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरून पुलावर आणि पुलांवरून प्लॅटफॉर्मवर येणे सुलभ व्हावे, यासाठी रेल्वे मंत्रालयाने सरकते जिने बसवण्याच्या निर्णय घेतला. सरकते जिने हे प्रवासी सुविधा म्हणून स्थानकात आहेत. मात्र वाढत्या तक्रारींमुळे जिनेच प्रवासी गैरसोईचे मुख्य ठिकाण बनले आहे. याबाबद रेल्वेने प्रवाशांचा तक्रारीला गांभीऱ्यांने घ्यावेत असे मत महिला प्रवासी राखी सावंत यांनी सकाळला दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()