Mumbai News : खार - गोरेगाव सहावी रेल्वे लाईनचे काम पूर्ण ; ११२ किमीच्या वेगाने चाचणी पूर्ण !

उपनगरीय लोकल गती आणि क्षमता वाढविण्यासाठी रेल्वे प्रवाशांकडून लांबपल्या मेल
railway line
railway line sakal
Updated on

मुंबई - खार ते गोरेगाव दरम्यानच्या सहाव्या रेल्वे मार्गाचे काम ५ नोव्हेंबर २०२३ रोजी पूर्ण झाले. या अतिरिक्त लाईनमुळे उपनगरी विभागाची लाईन क्षमता वाढून गर्दी कमी होण्यास मदत होईल. तसेच अधिक लोकल चालविण्यास मदत होउन गाड्यांचा वक्तशीरपणा सुधारेल. या मार्गाची ११२ किमीच्या वेगाने यशस्वी तांत्रिक चाचणी झाली.

उपनगरीय लोकल गती आणि क्षमता वाढविण्यासाठी रेल्वे प्रवाशांकडून लांबपल्या मेल -एक्सप्रेस गाड्यासाठी स्वतंत्र मार्गिका उभारण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेवर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू केले आहे. खार ते गोरेगाव दरम्यान ८.८ किमीच्या मार्गिका उभारण्याचे काम पश्चिम रेल्वेने हाती घेतले आहे.

या कामासाठी पश्चिम रेल्वेने २९ दिवसच्या ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकमुळे २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यत ब्लॉक घेण्यात आला होता. या ब्लॉक दरम्यान ६ स्थानकांवर नॉन-इंटरलॉकिंगचे काम पूर्ण करण्यात आले.तसेच सध्याच्या पाचव्या मार्गिकेवर आणि दोन्ही जलद मार्गिकेवर १२ टर्नआउट्स आणि तीन ट्रॅप पॉइंट टाकले.

railway line
Mumbai Train: निवारा केंद्राची सोय तरी नेरुळ स्थानका बाहेर बेघरांचा वाढता घरोबा, प्रशासनाचे दुर्लक्ष

नवीन सहाव्या मार्गिकेवर ८ टर्नआउट्स घातले. सध्याच्या नऊ टर्नआउट्स मधून तीन ट्रॅप पॉइंट्स काढले. वांद्रे टर्मिनस यार्डला पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी स्वतंत्र कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यात आली. या मार्गाकरिता अडथळे निर्माण करणार्‍या रेल्वेच्या सध्याच्या इमारती पाडून त्याऐवजी नवीन बांधकामे करण्यात आली.

railway line
Mumbai Ahamdabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे पहिले स्थानक झाले तयार

यामध्ये १९२ फ्लॅट्सचे नवीन रेल्वे क्वार्टर्स, सहा नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (EI) इमारती, दोन नवीन ट्रॅक्शन सब स्टेशन (TSS) इमारती, तीन बुकिंग ऑफिसचा समावेश आहे. सुमारे ६०७ प्रकल्पग्रस्त नागरिकाचे (पीएपी) पुनर्वसन करण्यात आले. तसेच, जवळपास एक हजार झाडांचे स्थलांतर आणि पुनर्रोपण करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.