नवी मुंबई : नवी मुंबई पोलिस दलातील आणखी एका पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना उघडकिस आली आहे. सुर्यकांत गायकवाड 54 वर्षीय पोलिसाचे नाव आहे. या पोलिस सकाळी ते सोलापुर येथून नवी मुंबई परतत असताना, भिगवण येथे झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मागील चार दिवसात नवी मुंबई पोलिस दलातील चार पोलिसांचा वेगवेगळ्या कारणाने मृत्यू झाल्याने नवी मुंबई पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
गुरुवारी पहाटे मृत पावललेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुर्यकांत गायकवाड हे उरण येथे कुटुंबासह राहाण्यास होते. तसेच ते उरण पोलिस ठाण्यात कार्यरत होते. मात्र नुकतीच त्यांची सीबीडी येथील पोलिस आयुक्तालयात राखीव विभागात बदली करण्यात आली होती. त्यामुळे गायकवाड दोन दिवसाची सुट्टी घेऊन सोलापूरमध्ये मुळ गावी सलगर वस्ती येथे गेले होते. दोन दिवसाची सुट्टी संपल्याने गुरुवारी डयुटीवर हजर होण्यासाठी गायकवाड आपल्या दोन सहकाऱ्यांसह रात्री उशीरा नवी मुंबईत येण्यासाठी कारने निघाले होते. गायकवाड कार चालकाच्या बाजुच्या सीटवर तर त्यांचे सहकारी पाठीमागच्या सीटवर बसून प्रवास करत होते. पहाटेच्या सुमारास त्यांची कार भिगवण येथे आली असताना, भरधाव वेगात असलेली त्यांची कार पुढे जाणाऱ्या ट्रक्टरवर धडकली. या अपघातात गायकवाड बसलेली बाजु ट्रक्टरवर धडकल्याने गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात सुर्यकांत गायकवाड यांचे दोघे सहकारी देखील किरकोळ जखमी झाले आहेत.
चार दिवसात चार पोलिसांचा मृत्यू
गेल्या रविवारी एपीएमसी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण पवार यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
त्यानंतर खारघर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संतोष नामदेव पाटील यांनी आपल्या राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
या दोन पोलिसांच्या आत्महत्येच्या घटनेपाठोपाठ कळंबोली येथील पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलिस हवालदार धनराज महाजन यांचा ह्रदय विकाराच्या झटक्याने सोमवारी सकाळी मृत्यू झाला आहे.त्यानंतर गुरुवारी सकाळी सुर्यकांत गायकवाड यांचा भिगवण जवळ अपघाती मृत्यू झाला.
अशा पद्धतीने मागील चार दिवसांत नवी मुंबई पोलिस दलातील चार पोलिसांचा मृत्यू झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
mumbai news last four days four cops lost life in navi mumbai police department
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.