Mumbai News: मुलुंडमध्ये एका महिला व्यावसायिकाला घर नाकारल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे आता येथील भाजपचे स्थानिक आमदार मिहीर कोटेचा यांनी अशा घटनांना रोखण्यासाठी सहकारी उपनिबंधकांना एक निवेदन दिले आहे.
यामध्ये कोणतेही तत्सम कारण देऊन घर भाड्यासाठी अथवा विकत घेण्यासाठी कोणीही विरोध करू शकत नाही, अशा आशयाचे पत्र मुलुंडमधील प्रत्येक सोसायटीमध्ये लावण्यात यावे, अशी मागणी उपनिबंधकांकडे केली आहे.
मुलुंड पश्चिम येथील शिवसदन सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी तृप्ती देवरूखकर यांना व्यवसायासाठी घर भाड्याने देण्यास नकार दिला होता. तसेच पदाधिकाऱ्यांनी दाम्पत्याला अत्यंत चुकीची वागणूक देऊन आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
या घटनेचा मुलुंडमधील भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी निषेध केला आहे. शिवाय मुलुंड विभागात घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, तसेच भाषा, जाती-धर्माच्या आधारे कोणत्याही नागरिकांना घर अथवा दुकानाकरीता सोसायटीमध्ये जागा घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांना कोणताही विरोध करता येणार नाही.
अशा प्रकारची माहिती देणारे परिपत्रक मुलुंड उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या वतीने संपूर्ण विभागातील सर्व गृहनिर्माण संस्थांना पाठवावेत, असे लेखी निवेदन उपनिबंधक कार्यालयाला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.