Mumbai News : 'वर्षा' व 'सागर'वरच्या पाहुणचाराचा खर्च कमी केला, पण मेन्यू वाढवले; जाणून घ्या रेटकार्ड

पाहुण्यांना निरनिराळ्या ४४ पदार्थांची चव चाखता येणार आहे.
CM Eknath Shinde with Devendra Fadnavis aurangabad tour cancelled
CM Eknath Shinde with Devendra Fadnavis aurangabad tour cancelledSakal
Updated on

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ‘सागर’ बंगल्यावरील पाहुणचाराचा शाही थाट थांबवून आता साधेपणाने पाहुणचार होईल. पाहुण्यांसाठीच्या खानपान सेवेच्या खर्चाला कात्री लावून, दोन्ही बंगल्यांवर येणाऱ्या पाहुण्यांसाठी पाच कोटी रुपयेच खर्च करता येणार आहेत. चहापानाच्या खर्चावर मर्यादा आणल्या तरीही पाहुण्यांना निरनिराळ्या ४४ पदार्थांची चव चाखता येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या सरकारी बंगल्यावरील पाहुण्यांच्या खानपान सेवेसाठी पदार्थ ठरले आहेत. तशी यादी करून त्याच्या किमतीही निश्चित केल्या आहेत. या सेवेसाठी स्वतंत्रपणे खाद्यपदार्थ पुरवठादार नेमण्यात आले आहेत.

सत्तांतरानंतर पहिल्या तीनच महिन्यांत ‘वर्षा’वरील पाहुण्याचारासाठी तब्बल दोन कोटी ३८ लाख रुपये खर्च झाल्याने विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लक्ष्य केले होते. अधिवेशनातही विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता. या खर्चाची चर्चा सर्वत्र झाल्यानेच यापुढच्या पाहुणचारात आखडता हात घेतला असल्याचे बोलले जात आहे.

CM Eknath Shinde with Devendra Fadnavis aurangabad tour cancelled
Mumbai News : तीन अतिरेकी मुंबईत दाखल; मुंबई पोलिसांना फोन

साधारण व विशेष पदार्थ

  • साधारण पदार्थांच्या यादीत ४४ पदार्थांचा समावेश आहे, तर विशेष पदार्थांच्या यादीत २९ पदार्थ

  • साधारण पदार्थांमध्ये सर्वांत स्वस्त पदार्थ वेफर्स असून त्यासाठी कंत्राटदारास फक्त १० रुपये मिळणार

  • विशेष पदार्थांमध्ये पेयांत मसाला चहा, कॉफी व ग्रीन टी ही सर्वात स्वस्त असून त्यासाठी १४ रुपये, तर मसाला दुधासाठी १५ रुपये मोजावे लागणार

CM Eknath Shinde with Devendra Fadnavis aurangabad tour cancelled
BEST Mumbai : मुंबईकरांना आता रात्री-अपरात्री बस मिळणार नाही; 'बेस्ट'ची नाईट शिफ्ट बंद
  • विशेष खाद्यपदार्थांमध्ये कोथिंबीर वडी, सामोसा, उकडीचे मोदक, स्पेशल पेढा हे सर्वात स्वस्त म्हणजे १५ रुपयांत दिले जाणारे

  • महत्त्वाची बाब म्हणजे साधारण व विशेष वर्गवारीत सर्वांत महाग हे शाकाहारी व मांसाहारी बफे असणार

  • साधारण पदार्थांमध्ये शाकाहारी बफेसाठी १६० रुपये, तर मांसाहारी बफेसाठी १७५ रुपये आकारले जातील

  • विशेष पदार्थांच्या यादीत स्पेशल शाकाहारी बफे ३२५ रुपयांना, तर मांसाहारी बफे ३५० रुपयांत उपलब्ध करून दिला जाईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.