लोकल प्रवाशांना होणार फायदाच फायदा; कारण आता लोकलमध्ये बसवणार MTRC सिस्टीम

लोकल प्रवाशांना होणार फायदाच फायदा; कारण आता लोकलमध्ये बसवणार MTRC सिस्टीम
Updated on

मुंबई, ता. 11 : रेल्वे रुळाला तडा गेल्यास, ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यास लोकल सेवेचे तीन-तेरा वाजतात. त्यानंतर लोकल सेवा कधी सुरू होईल, याची माहिती रेल्वे प्रवाशांना मिळत नाही. परिणामी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी पश्‍चिम रेल्वेकडून मोबाईल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन (एमटीआरसी) यंत्रणा बसविण्यात येणार आहे. लोकलमध्ये तांत्रिक बिघाड किंवा रेल्वेखोळंबा झाल्यास लोकलच्या वेळापत्रकात झालेल्या बदलाची प्रवाशांना अचूक माहिती मिळण्यास या यंत्रणेमुळे मदत होणार आहे. 

मेट्रो आणि मोनोच्या कंट्रोलच्या धर्तीवर पश्‍चिम रेल्वे मार्गावर एमटीआरसीची यंत्रणा बसविण्यात येणार आहे. एमटीआरसी यंत्रणेमुळे कंट्रोल रूम आणि प्रत्येक प्रवाशांमध्ये संवाद, समन्वय साधण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पासाठी पश्‍चिम रेल्वेला पाच कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. एमटीआरसी यंत्रणेचा फायदा मोटरमन आणि रेल्वेच्या कंट्रोल रूममध्ये असणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांनाही होणार आहे. पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचते आणि लोकल जागीच थांबून प्रवासी खोळंबतात. अशा वेळी लोकलमधील प्रवाशांना माहिती देण्यासाठी ही यंत्रणा प्रभावी ठरेल, असा विश्वास पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

उपनगरीय लोकल ज्या वेळी रेल्वेमार्गावर धावते, त्यावेळी मोटरमनचे मोबाईल बंद असतात. त्यामुळे लोकल बंद पडली किंवा कोणती घटना घडली, तर मोटरमन कर्मचाऱ्यांना मोबाईल सुरू करून कंट्रोल रूमशी संवाद साधावा लागतो. त्यात बराच वेळ जातो. ही अडचण दूर करण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पश्‍चिम रेल्वेने आपल्या प्रत्येक लोकलमध्ये एमटीआरसी यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पश्‍चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

महत्त्वाची बातमी : छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याबाबतच्या सरकारने जारी केलेल्या अधिकृत मार्गदर्शक सूचना

मोबाईल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन (एमटीआरसी) म्हणजे काय? 

मोबाईल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन (एमटीआरसी) ही अत्याधुनिक यंत्रणा आहे. या यंत्रणेद्वारे लोकल नेमकी कोणत्या ठिकाणी आहे, याची माहिती मोबाईल ऍपवर मिळणार आहे. चर्चगेट ते डहाणू दरम्यान 120 किलोमीटर रेल्वेपट्ट्यात ही यंत्रणा कार्यरत असेल. 

mumbai news mobile train radio communication system will be installed on western local train line

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.