Mumbai News : जेथे ज्याची ताकद, तेथे त्याला संधी लोकसभेसाठी ‘मविआ’चे बेरजेचे राजकारण

रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या कार्यक्रमानंतर काल तीन माजी मुख्यमंत्री एकाच विशेष विमानाने मुंबईत परतले.
mumbai
mumbaisakal
Updated on

मुंबई - नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात निकराची झुंज देण्याचा निर्णय महाविकास आघाडीत झाला असून जेथे ज्याची ताकद, तेथे त्याला संधी असे जागावाटपाचे सूत्र असावे, असे जवळपास निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण या तीन माजी मुख्यमंत्र्यांनी काल यासंदर्भात प्रारंभिक चर्चा केली असून या तीन पक्षांना समविचारी पक्षांचे पाठबळ देण्याची जबाबदारी शेकापच्या जयंत पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या कार्यक्रमानंतर काल तीन माजी मुख्यमंत्री एकाच विशेष विमानाने मुंबईत परतले. महाराष्ट्रातील सर्व ४८ जागांचे पक्षस्थिती दर्शविणारा आराखडा तयार करण्यात आला आहे. तिन्ही पक्षांनी यासंदर्भात केलेल्या अभ्यासावर परस्परांमध्ये चर्चा होणार आहे. महागाई, केंद्रातील आणि राज्यातील सरकारबद्दलची अनास्था आणि जोडतोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्रातील जनतेला बदल हवा आहे. जनतेच्या या इच्छेची दखल घेत जागावाटप प्रतिष्ठेचे न करता ते जिंकणे हा एकमेव उद्देश मनात ठेवून करावे असेही स्पष्ट करण्यात आले असे समजते.

गीते लढविणार ‘रायगड’

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जयंत पाटील हेही या तीन माजी मुख्यमंत्र्यांसमवेत होते. रायगड लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती लक्षात घेता अनंत गीते यांनीच लोकसभा निवडणूक लढवावी, असे त्यांना अनौपचारिकपणे सांगण्यात आले आहे. गेल्या निवडणुकीत ते जेमतेम दहा हजार मतांनी पराभूत झाले होते. रायगड लोकसभा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या पारड्यात असेल हे लक्षात घेत तयारीला लागा, असे स्पष्ट संकेत दिले गेले आहेत.

mumbai
Mumbai local News: लोकल स्टेशनवर होणार महत्वाचे बदल, मनसेच्या मागणीला यश

काँग्रेसला योग्य न्याय देणार

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जेमतेम एक लोकसभा मतदारसंघ जिंकता आला होता.त्याच आधारावर जागावाटप झाले तर तो काँग्रेसवर अन्याय होईल, असे या पक्षाचे मत आहे. या भावनेची दखल घेत काँग्रेसला योग्य न्याय दिला जाईल, असे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मान्य केले आहे.

mumbai
Mumbai Pollution: आदित्य ठाकरेंमुळेच वाढलय मुंबईचे प्रदूषण; आशिष शेलारांचा आरोप

‘शेकाप’ची मदत

गेल्या वेळी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांना सर्वतोपरीने मदत करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाने यावेळीही महाविकास आघाडीला सर्वतोपरीने मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. इतिहासात कधीकाळी भाजपला अप्रत्यक्ष मदत झाली असेलच तर यापुढे तसे काहीही होणार नाही याची काळजी घ्या, असे मैत्रीपूर्ण आवाहन ‘शेकाप’ला करण्यात आले. तशी हमी देत असल्याचा शब्द पक्षाच्या नेत्यांनी दिल्याचेही समजते. धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र आणण्यासाठी आता राज्यभरात याच धर्तीवर मोहीम राबवण्यात येणार असून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रभर दौरे काढणार आहोत असे सांगितले आहे .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()