Mumbai News : संशोधन, नाविन्यतेवर औषध उद्योगाने भर द्यावा; मनसुख मांडवीय यांचे आवाहन

Mansukh Mandaviya
Mansukh Mandaviya
Updated on

मुंबई : गुणवत्ता, संशोधन आणि विकास ही काळाची गरज असून भारतीय औषधनिर्मिती उद्योगाकडे जग आज अपेक्षेने पहात आहे. अशावेळी भारतीय औषधनिर्मात्यांनी गुणवत्तेवर भर देऊन या संधीचा फायदा घ्यावा, असे मत केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी येथे व्यक्त केले.

Mansukh Mandaviya
Mumbai : अभियंत्यांना मारहाण झाल्यास अजामीनपात्र गुन्हा नोंदावावा; म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनची मागणी

इंडियन फार्मास्युटिकल अलायन्सच्या (आयपीए) आठव्या ग्लोबल फार्मास्युटिकल क्वालिटी समिटच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. कोविडसारख्या जागतिक संकटात भारताने जगाला दर्जेदार लशी व औषधपुरवठा करून महत्वाची भूमिका बजावली.

नफ्यासाठी काम न करण्याच्या उद्योजकांच्या या वृत्तीमुळे जगात भारताची प्रतिष्ठा वाढली. आता औषधांबाबत जगाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नवकल्पनांना चालना देऊन उद्योग व संशोधन-शैक्षणिक संबंध मजबूत करण्याची गरज आहे. अशी नवी मॉडेल तयार करण्यासाठी या परिषदा उपयुक्त ठरतील, असेही मांडवीय म्हणाले.

Mansukh Mandaviya
jayant patil: स्वतःला असं बघायला आवडेल..; प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेत जयंत पाटलांचं सूचक विधान

या दोन दिवसीय शिखर परिषदेत उद्योजक, जागतिक नियामक, तज्ञ आणि भागधारक यांनी भारतीय औषधनिर्मिती क्षेत्रातील महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. टोरेंट फार्मास्युटिकल्सचे अध्यक्ष आणि आयपीए चेअरमन समीर मेहता यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

या परिषदेत केंद्रीय फार्मास्युटिकल विभागाच्या सचिव एस. अपर्णा, इंडियन फार्मास्युटिकल अलायन्सचे सरचिटणीस सुदर्शन जैन तसेच सिप्ला, डॉ. रेड्डीज लॅब, ल्यूपिन, सन फार्मा आणि झायडस कॅडिला या औषध उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपले विचार मांडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.